बहुजननामा ऑनलाइन टीम –पुणे शहर आणि परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. सुमारे 200 रुग्णांना जम्बो रुग्णालयात हलवून या ठिकाणी हे काम दोन टप्प्यात करण्यात येणार होते. मात्र, जम्बोच्या अकार्यक्षमतेमुळे जुन्या इमारतीचतच रुग्णांना हलवून हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
ससूनच्या नवीन इमारतीमध्ये टप्प्याटप्याने व्हेटिलेटरची संख्या 123 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ 50 व्हेंटिलरचे नियोजन करण्यात आले होते. मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. सध्या पाच आयसीयु आणि 419 ऑक्सिजन बेड आहेत. त्यासाठी प्रत्येक बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. सर्व बेडवर रुग्ण असले तरी प्रत्येकाला ऑक्सीजनची गरज भासत नाही. गरजेनुसार रुग्णाला कमी-अधीक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जाते. मात्र, ऑक्सिजनवरी रुग्णांची संख्या जात असून रुग्णालयात 13 हजार किलो लिटर क्षमतेची ऑक्सिजन टँक आहे. हा टँक एक दिवसाआड भरावा लागतो.
मागील पाच महिन्यात ऑक्सिजनची मागणी टप्प्याटप्याने वाढत गेल्याने ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.ऑक्सिजन टँकच्या मुख्य पाईपलाईनची क्षमता वाढवण्यात येणार आहे. लिक्विड ऑक्सिजनचे गॅसमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा दुप्पट करणे, गॅस सिलिंडर वाढविणे, नवीन टँक उभारणे इत्यादी कामे युद्ध पातळीवर करण्यात येणार आहेत. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जुन्या इमारतीत 100 ते 120 बेड तयार होणार आहेत. याठिकाणी नव्या इमारती मधील एका-एका मजल्या वरील ऑक्सिजनवर असलेले रुग्ण टप्प्याटप्याने हलवण्यात येणार आहेत. सध्या याठिकाणी 6 हजार किलो लिटर ऑक्सिजन टँकचे काम पूर्ण झाले आहे.
ससूनची सध्यस्थिती
एकूण खाटा – 547
ऑक्सिजनवरील -419
आयसीयु -5
व्हेंटीलेटर – 123