बहुजननामा ऑनलाईन टीम : आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या एटीमएमद्वारे अश्या अनेक सुविधा मिळतात, ज्या आपल्याला माहित नसतात, त्यातील महत्वाची म्हणेज बँकेद्वारे त्यांच्या डेबिट कार्डवर विनामूल्य अपघात विमा सुविधा दिली जाते. विम्याची रक्कम ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत आहे. बँकात्याचा प्रचार करीत नाहीत, परिणामी कोणताही पीडित व्यक्तीला ह्या विम्याचा लाभ घेता येत नाही. बँक खाते उघडताना बँकेतून मिळालेल्या किटवर छोट्या शब्दांत त्याचा उल्लेख केला आहे जो ग्राहकांच्या लक्षात येत नाही.
एटीएम डेबिट कार्डवर ग्राहकांकडून अपघात विमा मिळण्याची मर्यादा प्रत्येक बँकेत वेगवेगळी असते. यासाठी बँकांकडून अट अशी आहे की एटीएम कार्ड सक्रिय असले पाहिजे आणि व्यवहार किमान ९० दिवसांत एकदा तरी झाले असावेत. दरम्यान विमा योजनेचा प्रचार न करण्याविषयी, बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा ग्राहकांचे खाते बँकेत उघडले जाते तेव्हा ही माहिती दिली जाते. युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख गुना नंद गामी यांनी सांगितले की, युनियन बँक ग्राहकांना एटीएम कार्डवर दोन लाखांपर्यंत विमा देते.
एचडीएफसी बँकेचे क्लस्टर हेड अजय गुप्ता म्हणाले की, एचडीएफसी बँकेच्या वेगवेगळ्या कार्डांवर वेगवेगळ्या मर्यादा आहेत. प्लॅटिनम कार्डधारकाचा १० लाखांपर्यंत विमा उतरविला जातो. पीएनबी विभागीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक यशोदा नंद पांडे यांनी सांगितले की, त्यांच्या बँकेत ५० हजार ते पाच लाखांचा विमा ग्राहकांना दिला जातो. खातेधारक जेथे असेल तेथे दावा धारकास अर्ज करावा लागतो. महिन्याभरात, कुटुंबास विमा राशी मिळते. एटीएम कार्डधारकांकडे विम्याची माहिती नसल्याकारणाने बँकांमध्ये मृत्यू नंतर मृत्यूचे दावे आढळत नाहीत. एका वर्षात अशी किती दावे पेमेंटसाठी येतात ? असे विचारले असता बँक अधिकाऱ्यांनी हे कबूल केले की, दावे टाळण्यासाठी हे प्रसिद्ध केले गेले नाही.
Visit : bahujannama.com