भोपाळ : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना भलेही पक्षात मोठे पद नसेल, परंतु पक्षाचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांनंतर आता पक्षाने सिंधीयांवर झारखंडचीदेखील जबाबदारी सोपविली आहे. त्याचबरोबर कमलनाथ सरकारमधील मंत्री उमंग सिंघार यांनाही पक्षाने जबाबदारी दिली आहे.
झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची घोषणा केली असून कॉंग्रेसच्या या यादीमध्ये माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे. या यादीतील अचंबित करणारे नाव म्हणजे कमलनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री उमंग सिंघार, कारण तेच सिंघार ज्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
राहुल, सोनिया, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या यादीत आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या प्रियंका गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह दिग्विजय सिंह यांचा या यादीत समावेश नाही. तर मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री उमंग सिंघार यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.
Visit : bahujannama.com