पुणे बहुजननामा ऑनलाईन- नुकताच पुणे महानगर पालिकेने मॉल आणि मल्टिप्लेक्स मध्ये पार्कींग निशुल्क केल्याची ताज असतानाच आता रुग्णालये आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णालायत येणाऱ्या पेशंटकडून घेण्यात येणारे बेकायदेशीर पार्किंग शुल्क बंद करण्यात यावे अशी मागणी वडगावशेरी मतदार संघाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष किरण भालेराव यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना भेटून लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे कि,रुग्णालायत येणाऱ्या पेशंटकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून पार्किंग निशुल्क केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. निवेदन देते वेळी किरण भालेराव ,विक्रांत भोसले ,शमसुद्दीन शेख , विनोद टोपे ,सुरज गुलाटी, ओमकार क्षीरसागर आदी उपस्थित होते.