मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस वॅक्सीनबाबत आलेल्या मोठ्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चतम स्तरावर पोहाेचला आहे. बीएसईचा 30 शेअरचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 350 अंकांनी उसळी घेत 44 हजारांच्या पुढे पोहाेचला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदा 44 हजारांपुढे गेला आहे, तर एनएसईचा 50 शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 100 अंक उसळून 12871 च्या स्तरावर पोहाेचला आहे. एक्सपर्टसचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्येच गुंतवणूकदरांनी 71 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांतसुद्धा शेअर बाजार पुन्हा नव्या शिखरावर पोहाेचताना दिसेल.
शेअर बाजारात का आली जोरदार तेजी
मॉडर्नाने म्हटले आहे की, त्यांची कोरोना वॅक्सीन 94.5 टक्के यशस्वी ठरली आहे. यापूर्वी फायजरनेसुद्धा आपली वॅक्सीन 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले होते. वॅक्सीनबाबत चांगली बातमी आणि मदत पॅकेजमुळे बाजारात उत्साह दिसत आहे. अमेरिकन बाजारात जबरदस्त तेजी जारी आहे. भारताच्या बायोलॉजिकल ए. ने सुद्धा ह्यूमन ट्रायल सुरू केली आहे. यादरम्यान ब्रेंट क्रूडमध्येसुद्धा 3 टक्केंची उसळी दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात तेजीची स्थिती ही आहे की, कालच्या व्यवहारात डीओडब्ल्यू 471 अंक वाढून 29950 च्या स्तरावर बंद झाला होता, तर नॅसडॅक 95 अंकांनी वाढून 11924 च्या स्तरावर बंद झाला.
आता काय करावे गुंतवणूकदरांनी
दिग्गज ब्रोकरेज फर्मसने निफ्टीचे टार्गेट वाढवले आहे. गोल्डमॅन सॅक्स आणि नोमुराचे म्हणणे आहे की, बाजारात तेजी जारी राहील. ज्यामुळे प्रमुख निर्देशांक नवीन उंचीवर राहतील. गोल्डमॅन सॅक्सचे म्हणणे आहे की, निफ्टी 50 इंडेक्स 11 टक्केच्या तेजीसह 14,100 च्या स्तरावर पोहाेचू शकतो. नोमुराने या इंडेक्सला 13,640 चा स्तर दिला आहे, जो त्यामध्ये सुमारे 8 टक्केपर्यंत वाढ दाखवतो. गोल्डमॅन सॅक्सने भारतीय बाजाराची रेटिंगसुद्धा वाढवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशात इक्विटी गुंतवणूक वाढत आहे.