अयोध्या : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे. याच मंदिराच्या बांधकामाच्या पायासाठी खोदकाम केले जात आहे. राम लीलाच्या मंदिराच्या बांधकामासाठी 40 फुट खोलपर्यंत पाया खोदत असताना एक चरण पादुका आणि प्राचीन दगडांचे तुकडे आणि काही मूर्तींचे अवशेष सापडले आहेत. प्राचीन मंदिराचे हे अवशेष श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने सुरक्षित ठेवले आहेत. पुरातत्व पद्धतीने या अवशेषांचे संशोधन केले जाणार आहे.
यापूर्वी सुद्धा जन्मभूमी परिसराच्या समतोलीकरणाच्या कामादरम्यान प्राचीन अवशेष सापडले होते. यापूर्वी सुद्धा प्राचीन नक्षीकाम असलेल्या शिला काढण्यात आल्या होत्या. काही दुभंगलेल्या मूर्ती सुद्धा सापडल्या आहेत. प्राचीन मंदिराचे दगडी अवशेष सुद्धा सापडले आहेत.
उत्खननात सीता मातेच्या स्वयंपाक घरासंबंधीत एक विशाल दगड सापडला जो किचन ओट्यासारखा आहे. पोळीपाट-लाटणे सुद्धा सापडले आहे. याशिवाय मानस भवनच्या उत्खननात अति प्राचीन श्रीरामाच्या चरण पादुका सुद्ध सापडल्या आहेत. न्यासाच्या सूत्रांनी सांगितले की, हे सर्व अवशेष राम जन्मभूमी परिसरातच्या संग्रहालयात जतन करण्यात आले आहेत.
राम मंदिराच्या बांधकामानंतर परिसरातच म्युझियम बनवून हा प्राचीन ठेवा भाविकांना दर्शनासाठी ठेवला जाईल. भाविक रामललाच्या दर्शनानंतर या प्राचीन धार्मिक अवशेषांचे दर्शन करू शकतील. या वस्तु तुटलेल्या स्थितीत आहेत. सध्या उत्खननाचे काम पूर्ण झाले आहे.