बहुजननामा ऑनलाइन टीम – लासलगांव: लासलगांव शहर विकास समितीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना लासलगांव येथील नागरी सुविधांबाबत निवेदन(Statement ) दिले. या निवेदनात लासलगांवच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या निवेदनातील(Statement ) प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन भुजबळ यांनी समितीच्या सदस्स्यांना दिले.
लासलगांव डंपींग राऊंड ( कचरा डेपो)
लासलगांव शहराला शिवनदीच्या किनारी कचरा डेपो आहे. तेथे गेल्या २० वर्षापासुन कचरा टाकला जातो.
कचरा डेपो हा वेळो-वेळी पेटवला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व धुरामुळे नागरीकांच्या आरोग्य धोक्यात येते. नागरीकांचा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर शासनाकडुन निधी उपलब्ध करून कचर्यापासुन खत निर्मिती प्रकल्प सुरू करून कच-याचे संपूर्णपणे निर्मुलन करावे.
या निवेदनात हे प्रश्न सुटावे अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रकाश पाटील, विकास कोल्हे, प्रविण कदम, देवेद्र भावसार, महेश मोरे, धर्मेश जाधव, बबन शिंदे,संदिप उगले,अनिल आब्बड, मयुर झांबरे, राजेंद्र कराड, अफजल शेख, राजाभाऊ जाधव, महेश बकरे, महेश हांडगे, रामेश्वर कहांडळ, मनोज होळकर, ललित पानगव्हाणे, संदिप गांगुर्डे, शरद साबळे, हर्षद नागरे,सुरेश कुमावत यांच्या सह्या आहेत.