बीड : बहुजननामा ऑनलाइन – सावता परिषदेच्या वतीने येथील जिल्हा संकुलावर ३१ जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा व परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेश आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार असून खा. प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माळी समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी दिली.
या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, सावता परिषदेच्या धोरणानुसार प्रत्येक तीन वर्षाला संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
यावेळी हे अधिवेशन बीड येथे होणार असून ३१ जानेवारी रोजी जिल्हा क्र ीडा मैदानावर दुपारी ४ वा. हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी आ. भीमराव धोंडे, आ. अतुल सावेे, आ. जयकुमार गोरे, आ. योगेश टिळेकर, आ. मनिषा चौधरी, आ. देवयानी फरांदे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.