नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY | पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) घेऊन आले आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित बनवू शकता. या योजनेत आई-वडील किंवा गार्डियन एका मुलीच्या नावावर केवळ एक खाते उघडू शकतात आणि दोन वेगवेगळ्या मुलींच्या नावावर कमाल दोन खाती उघडू शकतात. यासंबंधीची सर्व माहिती जाणून घेवूयात…
किती करावे लागते डिपॉझिट
यामध्ये मिनिमम डिपॉझिट(Minimum deposit) 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.
किती मिळेल व्याज
आता एसएसवाय (Sukanya Samriddhi Account) मध्ये 7.6 टक्केच्या दराने व्याज दिले जात आहे जे इन्कम टॅक्स सूटसह आहे.
मॅच्युरिटीवर मिळेल 15 लाखापेक्षा जास्त
जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये
लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये
मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.
येथे उघडा खाते
जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे. तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.
द्यावी लागतील ही कागदपत्र
मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.
web title: SSY | This is a special facility offered by the bank! Open ‘He’ account at Rs 250, get Rs 15 lakh on maturity; Learn how?
Pune News | बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
Praveen Darekar | ‘एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा ‘महाविकास’चा डाव’
Rain in Maharashtra । आज पुण्यासह 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; हवामान खात्यानं दिला Red Alert
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे दर