बहुजननामा ऑनलाइन टीम – नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीने कबूल केले कि त्याने आपल्या बहिणीसाठी ड्रग्स खरेदी केले होते. सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) गेले आहे, तेव्हापासून या प्रकरणाला अनेक वेगळी वळणं आली आहेत. या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीने एनसीबीला सांगितले आहे कि ही ड्रग्स रियासाठी खरेदी केले गेले होते.
शोविकने एक निवेदन नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) दिले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला ड्रगशी संबंधित संशयास्पद चॅट सापडल्यानंतर एनसीबीने हस्तक्षेप केला होता. शुक्रवारी शोविक चक्रवर्ती एनसीबी अधिकाऱ्यांसह ड्रगच्या तपासणीत चौकशीसाठी घराबाहेर जाताना दिसला होता आणि रात्री त्याला अटकही करण्यात आली. कथितपणे एनसीबीने शुक्रवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरांचा तपास केला होता.
Showik Chakraborty and Samuel Miranda will be arrested in two hours, formal process underway: Narcotics Control Bureau#SushantSinghRajputDeathCase
— ANI (@ANI) September 4, 2020
यापूर्वी भावा-बहिणीमधील संभाषण उघडकीस आले होते. रियाने तिच्या भावाला सांगितले आहे की, ‘तो दिवसातून चार वेळा धूम्रपान करतो म्हणून त्यानुसार योजना बनवा.’ मीडियामध्ये चॅट लीक झाल्यानंतर शोविकने आपल्या वक्तव्यात रियाचे नाव ष्टपणे घेतले आहे. आता आपल्याला हे पाहावे लागेल कि पुढील तपासणीसाठी रियाला बोलावले जाईल का.
या दरम्यान कथितपणे ड्रग पॅडलरने रिया आणि भाऊ शोविक चक्रवर्तीशी संबंध असल्याची कबुली दिली आहे आणि तो एनसीबीच्या ताब्यात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज प्रकरणात ऋषभ ठक्कर नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही बोलावले आहे. त्याला ईडीने १ सप्टेंबर रोजी बोलावले होते आणि आठ तास विचारपूस केली होती.