पुणे : बहुजननामा ऑनलाइन – SSC HSC Exam Offline | गेल्या अनेक दिवसांपासून 10 वी आणि 12 वीची परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना जो संभ्रम निर्माण झाला होता त्यावर आज महामंडळाच्यावतीने 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेबाबत खुलासा करण्यात आला आहे.10 वी आणि 12 वीच्या परीक्षा या ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन (SSC HSC Exam Offline) पद्धतीनेच होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे (maharashtra state secondary and higher secondary board) अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिली आहे.
परीक्षेचा कालावधी
मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार १२ वीची परीक्षा २० फेब्रुवारी दरम्यान व इ. १० वीची परीक्षा ०१ मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. पण चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच इ. १२ वी लेखी परीक्षा दि. ०४ मार्च २०२२ ते दि. ३० मार्च होणार आहे. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. १४ फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत होणार आहे. (SSC HSC Exam Offline)
१. इ. १० वी लेखी परीक्षा दि. १५ मार्च २०२२ ते दि. ०४ एप्रिल २०२२
श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि २५ फेब्रुवारी २०२२ ते दि. १४ मार्च २०२२
२. विद्यार्थी संख्या सद्यस्थितीत मंडळाकडे परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
इ. १२ वी – १४,७२,५६२
इ. १०वी – १६.२५,३११
३. विषय माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या
मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरूपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. इ. १२ वी विषय १५८, विज्ञान शाखा माध्यम ०४, इतर शाखा माध्यम ०६ प्रपत्रिका संख्या ३५६ (SSC HSC Exam Offline)
इ. १० वी विषय ६० माध्यम ०८, प्रश्नपत्रिका संख्या १५८
४. परीक्षेत विविध घटकांचा सहभाग –
सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिक्षक, मुख्य नियामक, नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व भरारी पथक यांचा सहभाग असणार आहे.
Web Title :- SSC HSC Exam Offline | Class 10 and Class 12 examinations will be held offline maharashtra state secondary and higher secondary board has announced
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर
Ramesh Deo Passes Away | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे 93 व्या वर्षी निधन