मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ramesh Deo Passes Away | मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा अभिनेता म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचं निधन झालं आहे. त्यांचे पूत्र अजिंक्य देव यांनी माध्यमांशी बोलताना रमेश देव यांच्या निधनाचे (Ramesh Deo Passes Away) वृत्त दिले. त्यांनी 93 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) निधन झाले. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर (Kolhapur) येथे झाला होता. ‘आनंद’ (Anand Movie) आणि ‘ताकदीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. रमेश देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतू अभिनय केला आहे. मराठी अभिनेत्री सीमा देव (Seema Dev) त्यांची पत्नी असून अभिनय देव (Abhinay Deo) आणि अजिंक्य देव (Ajinkya Deo) ही त्यांची दोन मुले आहेत. (Ramesh Deo Passes Away)
रमेश देव यांना राजा परांजपे प्रतिष्ठानचा (Raja Paranjape Pratishthan) जीवनगौर पुरस्कार (Jeevan Gaurav Puraskar) मिळाला होता. 1956 साली त्यांनी अंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर आरती हा त्यांचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी पैशाचा पाऊस आणि भाग्यलक्ष्मी या चित्रपटांत काम केलं.
Web Title :- Ramesh Deo Passes Away | veteran actor ramesh deo passes away at the age of 93
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rice side effects | भात खाणे आवडते का, एकदा जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान
Pune Crime | तरुणीचा पाठलाग करुन अॅसिड टाकून मारण्याची धमकी; पुण्याच्या खडकी परिसरातील घटना