बहुजननामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाबरोबरच नृत्य कौशल्याने सर्वांच्या मनात राज्य करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला (Sonalee Kulkarni) आज वेगळ्या अशा ओळखीची काही गरज नाही. सोनालीचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. सोनालीने (Sonalee Kulkarni) आज चित्रपटसृष्टीत अप्सरा अशी ओळख निर्माण केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोनाली सध्या तिच्या महाराष्ट्र टुरिझम या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख प्रेक्षकांना करून देत आहे. या कार्यक्रमाचाच भाग म्हणून सोनालीने अमरावतीला भेट दिली. यावेळी ती अमरावतीतील खाद्यसंस्कृती त्याचबरोबर विविध जागांची माहिती देताना दिसली. अमरावतीतील प्रसिद्ध अशा अंबाबाई मंदिरात जाऊन तिने दर्शन घेतले. सध्या तेथीलच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहे.
सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत सोनालीने (Sonalee Kulkarni) कॅप्शनमध्ये म्हटले की,“अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना…”. सध्या सोनालीचा हा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ चाहत्यांना भावल्याचा दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोनालीच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत.
तर अनेकांनी तिच्या व्हिडिओवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. सोनालीला खरी प्रसिद्धी ‘बकुळा नामदेव घोटाळे’
या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर ती ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली.
Web Title :- Sonalee Kulkarni | marathi actress sonalee kulkarni played gondhal at Amravati ambabai mandir video viral
हे देखील वाचा :
Chandrashekhar Bawankule | शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Bhalchandra Kulkarni Passed Away | मराठी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन