नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलेक्झेंडर फ्रिडमॅन रशियातील 11 व्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. परंतु, एका श्रीमंत वडीलांचा मुलगा असतानाही तो स्वयंपूर्ण आहे. आजच्या तरूणांसाठी तो एक आदर्श म्हणता येईल. त्याची हीच गोष्ट लोकांना आवडते. वडील अरबपती असतानाही स्वत: मॉस्कोच्या बाहेरील परिसरात दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये 500 डॉलर महीना भाडे देऊन तो राहतो. त्याच्याजवळ स्वत:ची गाडी नाही आणि तो ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करतो. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार 19 वर्षांच्या फ्रिडमॅनने सांगितले की, तो आपल्या खाण्या-पिण्याचा आणि कपड्यांचा खर्च स्वत: करतो. त्याने घरातील सामानही आपल्या पैशाने खरेदी केले आहे. फ्रिडमॅनचे वडील मिखेल फ्रिडमॅन यांची संपत्ती 13.17 बिलियन डॉलरची आहे. त्यांचा मुलगा अलेक्झेंडर फ्रिडमॅन लंडनच्या जवळील एका हायस्कूलमधून पदवी घेऊन मागच्या वर्षीच मॉस्कोमध्ये परतला आहे.
यानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरवले. यासाठी त्याने पाच महिन्यांपूर्वी 5 कर्मचार्यांना घेऊन 405,000 डॉलरची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. तसेच त्याने मॉस्कोमधील अनेक रेस्टॉरन्टला हुक्का उत्पादनांचा पुरवठा करण्यासही सुरूवात केली. तो पुढील महिन्यात एक ऑनलाइन मार्केटिंग फर्म सुद्धा सुरू करणार आहे. ही कोणत्याही पित्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, त्याचा मुलगा कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या हिमतीवर आपला व्यवसाय सुरू करत आहे. सध्या तो आपल्या वडीलांच्या दुकानांनाही उत्पादन पुरवठ्याचे काम करत आहे.
फ्रिडमॅनचे म्हणणे आहे की, हे त्याच्या मेहनतीचेच फळ आहे की लोक त्याला त्याच्या वडीलांमुळे नव्हे, तर त्याच्या मेहनतीमुळे त्याच्याकडून माल खरेदी करतात. तो म्हणतो की, माझ्या वडीलांनी सांगितले की आपल्या देशात व्यापार आणि राजकारणाचा जवळचा संबंध आहे. माझ्या वडीलांनी मला नेहमी सांगितले की ते त्यांची संपत्ती दान करण्याच्या विचारात आहेत. मी हे समजून जगत होतो की, भाग्याचा कोणताही चमत्कार होणार नाही, उलट जे काही करायचे असेल ते स्वत:ला करायचे आहे.
वारसाहक्काने उद्योग
परंतु, अशा लोकांची यादी खुप मोठी आहे ज्यांना उद्योग वारसाहक्काने मिळाला आहे. मागच्या वर्षी 54 वर्षाच्या स्टील मॅग्नेट अलेक्सी मोर्डशोव यांनी आपली मुले किरील आणि निकिता यांना 1.7 अरब डॉलर दिले. 71 वर्षांच्या व्लादिमीर इवतुशेनकोव यांनी सिस्तेमा पीजेएससी या आपल्या उद्योगात आपला मुलगा फेलिक्सला 05 टक्क्यांची भागिदारी दिली. तर सध्या अलेक्झेंडर फ्रिडमॅन आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे.