नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत 1 एप्रिलपासून 50 पैसे ते एक रुपयांची वाढ होऊ शकते. कारण देशात बीएस-6 उत्सर्जन दर्जा असलेल्या इंधनाचा वापर सुरू होणार आहे. सध्या देशात बीएस-4 दर्जाचे इंधन उपलब्ध आहे. ते यूरो-मानकानुसार आहे. सरकारने वाहनांतून होत असलेले कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 1 एप्रिलपासून बीएस-6 दर्जा असलेले इंधन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्ली आणि अन्य शहरात प्रदूषण वाढण्याचे एक प्रमुख कारण वाहनांतून बाहेर पडणारा धूर हे आहे.
बीएस-6 दर्जा असलेले पेट्रोल-डीझेल
देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले, कंपनीच्या सर्व रिफायनरींनी बीएस-6 दर्जाच्या इंधनाचे उत्पादन सुरू कले आहे. आणि हे इंधन पुढील महिन्यात देशातील सर्व डेपोंमध्ये पोहचणार आहे. आम्ही 1 एप्रिलच्या कालमर्यादेचे पालन करत आहोत. एक एप्रिलपासून देशात पेट्रोल आणि डीझेल बीएस-6 दर्जाचे असेल. सध्या दिल्लीत पेट्रोलचे दर 73.36 रुपये प्रती लीटर आणि डीझेलचे 66.36 रुपये लीटर आहेत.
17 हजार करोडची गुंतवणूक
आयओसीने स्वच्छ इंधनाचे उत्पादन करण्यासाठी आपल्या रिफायनरी अधुनिक करण्यासाठी 17,000 करोड रूपयांची गुंतवणूक केली आहे. तर उद्योगाने सुमारे 30,000 करोड रूपये खर्च केले आहेत. त्यांनी म्हटले की, आम्ही 1 एप्रिलपासून बीएस-6 इंधनाच्या पुरवठ्यावरील परिणामाचा आढावा घेत आहोत.
50 पैसे ते एक रुपया प्रती लीटर वाढीची शक्यता
सिंह म्हणाले बीएस-6 दर्जाचे पेट्रोल आणि डीझेल अंतरराष्ट्रीय मानक दर बीएस-4 च्या तुलनेत जास्त आहे. कारण घरगुती इंधनाच्या किमती थेट जागतिक दरांशी संबंधित असतात. यामुळे पेट्रोलच्या किमतीत वाढ होईल. त्यांनी म्हटले की, यावर लक्ष दिले जात असून ही वाढ जास्त नसल्याने ती टप्प्याटप्प्याने करण्याची आवश्यकता नाही. हे दर एकाच वेळी वाढू शकतात. सध्या योग्य वाढीवर काम केले जात आहे. ही वाढ 50 पैसे ते एक रुपया प्रती लीटर होऊ शकते. बीएस-6 दर्जाचे इंधन अति स्वच्छ आहे. यामध्ये सल्फरची मात्रा प्रती मिलियन (10 लाख) (पीपीएम) प्रती 10 अंश असेल. जी बीएस-4 इंधनात 50 पीपीएम आहे.