नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जेव्हापासून ४५ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यास मान्यता दिली आहे. तेव्हापासून देशात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. तर दुसरी धक्कादायक बाब म्हणजे कोरोना लस घेऊन सुद्धा अनेक व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येत आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससचे संचालक आर के धीमान आणि त्याच्या पत्नीने नियमाप्रमाणे असणारे कालावधीप्रमाणे दोन वेळचा डोस घेऊन सुद्धा होळीच्या दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
अशी बाब समोर आली असताना सुद्धा, डॉ. धीमान यांनी लोकांना कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले, कारण त्यांच्या माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून तसेच कोरोनामुळे मृत्यू ओढावण्यापासून वाचण्यासाठी लस प्रभावी आहे. शिवाय जरी लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी यावेळी संक्रमणामध्ये लक्षणं अत्यंत सौम्य असतात,असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू लेफ्टनंट प्रो. बिपिन पुरी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांचा ११ दिवसांनंतर आणखी कोरोना अहवाल सकारात्मजक आला आहे. तरी देखील त्यांनी म्हटलं आहे कि, ही लस गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी आहे, तर, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. डी हिमांशू यांना देखील दोन्ही डोस घेऊन सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहितीत समजते.
दरम्यान, अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स येथील CNS Pharmacy ने फेब्रुवारी मध्ये काही रूग्णांना पूर्ण आणि अधिक प्रभावी औषधाऐवजी अर्धवट डोस दिल्यानंतर जाहीर क्षमा मागितली होती. तर ज्या लोकात कमकुवत प्रतिकारशक्ती हा पुन्हा एक घटक असू शकतो. कमकुवत प्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत औषधोपचार, वैद्यकीय उपचार किंवा अनुवांशिक मतभेदांमुळे असू शकते. वयानुसार देखील रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होऊ शकते. लशीची क्लिनिकल चाचणी वृद्ध प्रौढांमध्ये उच्च कार्यक्षमताही दाखवते.
लस घेतल्यानंतर व्यक्तीला कोरोना होऊ शकतो का?
अमेरिकेमध्ये काही व्यक्तींना कोरोना प्रतिबंध लस घेऊनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकरणांना breakthrough cases असं म्हटलं आहे. ज्यांनी अधिक चिंता वाढवली आहे. किंबहुना काही अभ्यासांमधून म्हटले आहे की, शक्यता खूप कमी असली तरी या breakthrough cases शक्य आहेत, जरी व्यक्तीने घेतलेले लस सर्वाधिक प्रभावी असले तरीही. अमेरिकेचे आघाडीचे शास्त्रज्ञ अँटनी फौकी यांनी यांनी देखील यास दुजोरा दिला आहे. तुम्ही कोट्यावधी लोकांचे लसीकरण करता तेव्हा अशाप्रकारचे संक्रमण पाहायला मिळूच शकते. तसेच, २ एप्रिलला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की २ डोस लसीचा खुराक दुसऱ्या डोसच्या २ आठवड्यानंतर ९० टक्के संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असतो. तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे लसीकरण (fully vaccinated) म्हणणे उचित होईल.
लस घेऊन सुद्धा होतोय संसर्ग ?
कोरोना प्रतिबंध लस घेऊन सुद्धा कोरोना संसर्ग होण्याची विविध कारणे असू शकतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे लशीचे सदोष व्यवस्थापन. तज्ज्ञांनी अशी चेतावणी दिली होती की ही लस दुर्मिळ आहे, याव्यतिरिक्त लस चुकीच्या पद्धतीने हाताळणे. तर आवश्यक तापमान न राखणे किंवा हाताच्या चुकीच्या भागावर डोस दिल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते. दुसऱ्या डोसपूर्वी तुम्ही कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तरी सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते.