सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – Solapur Crime News | सोलापूरमधील जुना विडी घरकुल परिसरामध्ये प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Solapur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कविता कल्याणम असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (Solapur MIDC Police) या महिलेचा प्रियकर संजय राठोड (रा. विजय ब्रह्मनाथनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Solapur Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
मागच्या दोन वर्षांपासून मृत महिलेचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. यानंतर दोघांतील प्रेमाचे संबंध संपले. यानंतर कविताचे लग्न झाले. तरीदेखील संदीप कविताचा पिच्छा सोडत नव्हता. यानंतर कविताने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. 5 मार्च रोजी आरोपी संदीप राठोड मध्यरात्री विवाहितेच्या घरी आला होता. यावेळी त्याने बराचवेळ दार ठोठावले पण कविताने दार उघडले नाही. तो बराच वेळ दार ठोठावत राहिला. त्यानंतर कविताने अखेर वैतागून दार उघडलं. यानंतर संदीप घरात आला आणि कविताला बेदम मारहाण केली. यानंतर संदीप ‘मला सोडू नकोस,’ असे सांगून तो रात्री निघून गेला. याचा त्रास झाल्याने कविताने दुसऱ्या दिवशी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Solapur Crime News)
मृत कविताचा पती कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर रोजगाराच्या शोधात तामिळनाडूमध्ये गेला होता.
यादरम्यान कविता आणि शेजारी राहणाऱ्या संदीप राठोड यांचे प्रेमसंबंध जुळले.
हि गोष्ट कविताच्या पतीला कळल्यानंतर पतीने समज देत असं पुन्हा होऊ नये, अशी ताकीद कविताला दिली.
तसेच कविताच्या आईनेदेखील तिला समज दिली. यानंतर या दोघांचे प्रेमप्रकरण तुटले.
यानंतर कविता ही सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात राहायला आली.
मात्र आरोपी प्रियकर संदीप याने तिची पाठ सोडली नाही. शेवटी कविताने वैतागून आपल्या आयुष्याचा शेवट केला.
मृत कविताला 11 वर्षांचा मुलगादेखील आहे. संदीप राठोड वारंवार कविताला त्रास देत होता अशी माहिती
कविताच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करावी
अशी मागणी देखील केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Solapur Crime News | married woman commits suicide in solapur after suffering from her lover troubles
हे देखील वाचा :
MP Sanjay Raut | भाजपकडून मैत्रीचा हात आला तर युती होणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
WPL 2023 | WPLमध्ये ‘या’ महिला खेळाडूने झळकावले सर्वात वेगवान अर्धशतक
Pune News | हिमतीने समोर गेल्यास महिला जग जिंकेल; जागतिक महिला दिनी आबेदा इनामदार यांचे प्रतिपादन