बहुजननामा ऑनलाईन – WPL 2023 | काल गुजरात जायंटस आणि आरसीबी यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात जायंटस संघाची ओपनिंग बॅट्समन सोफिया डंकले हिने WPLमध्ये वेगवान अर्धशतक झळकावले आहे. सोफियाला भारताच्या हरलीन देओलने उत्तम साथ देत गुजरात जायंटसच्या संघाची धाव संख्या 201 वर नेली. सोफियाने वादळी खेळी करत अवघ्या 28 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात अवघ्या सोफियाने फक्त 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. (WPL 2023)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या सामन्यात गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गुजरातच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. मेघनाने पहिलं षटक निर्धाव खेळलं. तर दुसऱ्या षटकात डंकलीने पहिला चौकार मारला. त्यानतंर तिसऱ्या षटकात डंकलीने सलग दोन चौकार मारले. मात्र या षटकात मेघना बाद आणि गुजरातच्या संघाला मोठा धक्का बसला. (WPL 2023)
यानंतर सोफिया डंकले आणि भारताच्या हरलीन देओल या दोघांनी संघाचा डाव सावरत संघाची धावसंख्या
201 पर्यंत नेली. हरलीन देओलने 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाला 190 धावा करता आल्या.
या सामन्यात आरसीबीचा अवघ्या 11 धावांनी पराभव झाला.
गुजरातला याआधीच्या सामन्यात युपी वॉरिअर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
या विजयासह गुजरातने आपले खाते उघडले आहे. तर आरसीबीच्या संघाचा हा सलग तिसरा पराभव होता.
Web Title : WPL 2023 | wpl 2023 sophia dunkley hit fastest fifty against rcb
हे देखील वाचा :
Pune News | हिमतीने समोर गेल्यास महिला जग जिंकेल; जागतिक महिला दिनी आबेदा इनामदार यांचे प्रतिपादन