सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Solapur Crime | अनैतिक संबंधात (Immoral Relationship) अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत प्लॅन तयार केला आणि थंड डोक्याने पतीचा खून केल्याची घटना सोलापूरमध्ये (Murder In Solapur) घडली आहे. यासाठी दोघांनी झोपेच्या गोळ्या, दोरी आणि चाकूची खरेदी केली होती. ठरल्याप्रमाणे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास महिलेच्या प्रियकराने घरात शिरून तिच्या पतीचा खून केला. मृत पतीचे नाव दशरथ नारायणकर, पत्नीचे नाव अरूणा दशरथ नारायणकर तर प्रियकराचे नाव बाबासाहेब बाळशंकर असे आहे. (Solapur Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावचा रहिवाशी असलेला दशरथ नारायणकर हा काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. मृत दशरथ हा त्याची पत्नी अरूणा आणि मुलीसोबत जुना विडी घरकूल परिसरातील केकडे नगरात राहत होता. त्याची पत्नी अरुणाचे बाबासाहेब बाळशंकर या तरुणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, पतीचा खून केल्यानंतर पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. (Solapur Crime)
मात्र, तिचा आणि तिच्या प्रियकराचा प्लॅन पोलिसांनी काही तासातच उघड केला. गुन्हे शाखेच्या तपास पथकाने आरोपीला काही तासांतच पकडले. सुरुवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण, पहाटेच्या सुमारास झालेला खून आणि पत्नीच्या जबाबावरून पोलिसांना वेगळाच संशय आला.
आजूबाजूला चौकशी केल्यानंतर पोलिसांना घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी बाबासाहेब बाळशंकर तिथे आल्याची
माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या क्रमांकावर कॉल केला, पण त्याचा मोबाइल बंद होता.
त्यानंतर संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.
गुन्हे शाखेचे तीन पथके त्याच्या शोधात होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने
बाबासाहेब बाळशंकर याला मुळेगाव क्रॉस रोडवरून रात्री 9.30 च्या सुमारास ताब्यात घेतले.
त्याने अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबातून दोघांनी मिळून खून झाल्याचे उघड झाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Solapur Crime | a shocking incident of a wife killing her husband with the help of her lover has taken place in solapur
हे देखील वाचा :