Skin Hydration | खाज येण्यापासून ते बारीक रेषांपर्यंत, त्वचेमध्ये पाणी कमी झाल्यास दिसतात ‘हे’ 5 चिन्हे..

Skin Hydration

बहुजननामा ऑनलाईन टीम – तुम्ही काहीही केले तरी तुमची त्वचा नेहमीच रूक्ष, कोरडी राहते. तसेच अनेकदा त्वचेला सारखी खाज येते (Skin Hydration). ही लक्षणे त्वचेमध्ये पाणी कमी पडल्यास दिसून येतात. निर्जलीकरणामुळे (Dehydration) तुमची त्वचा कोरडी होते. कारण निर्जलीकरण मध्ये तुमच्या त्वचेतील पेशींमधील (Skin Cells) पाण्याची आर्द्रता कमी होते. काही ठराविक लक्षणे आपल्या त्वचेतील पाण्याची कमतरता दर्शवतात. जाणून घेऊया कोणते आहेत ते लक्षण (Skin Hydration)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

खाज सुटणे (Itching)

जेव्हा तुमची त्वचेमध्ये पाण्याची कमतरता होते. पाण्याची कमतरचा झाल्यास त्वचा कोरडी होते आणि त्वचेला खाज सुटते. निर्जलीकरणामुळे खाज सुटू शकते, विशेषतः उष्ण किंवा कोरड्या हवामानात ही समस्या अधिक उद्भवते.

कोरडेपणा (Dryness)

निर्जलित त्वचा कोरडी (Dry Skin) आणि निर्जीव (Dead Skin) दिसते. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेची चमक गमावते आणि त्वचा क्रॅक (Skin Cracking) होऊ शकते. कोरडेपणा त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक स्तर कमकुवत करू शकतो, ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो.

बारीक रेषा आणि सुरकुत्या (Fine Lines And Wrinkles)

निर्जलीकरण झालेल्या त्वचेत त्वरीत बारीक रेषा (Fine Lines On Face) आणि सुरकुत्या (Wrinkles) निर्माण होतात. कारण त्वचेच्या पेशींना आवश्यक ओलावा मिळत नाही (Skin Hydration).

लालसरपणा आणि चिडचिड (Redness And Irritation)

निर्जलीकरण मुळे त्वचेवर लालसरपणा येतो. तसेच त्वचा जळण्याची सुद्धा शक्यता असते.
कारण त्वचेच्या पेशींना (Skin Cells) आवश्यक ओलावा मिळत नाही.
त्यामुळे त्वचेवर लालसरपणा येतो आणि त्वचेला सूज (Skin Swollen) येते.

त्वचा सोलून निघते (Skin Peels Off)

पाण्याच्या कमतरेतेमुळे त्वचेच्या पेशी एकमेकांपासून
विभक्त होतात आणि बाहेर पडतात.
त्यामुळे त्वचा सोलू शकते.