अमेरिका वृत्तसंस्था : वायफाय चा पासवर्ड न सांगितल्याचा वादातून लहान भावाने आपल्या बहिणीची हत्या केली. १८ वर्षाच्या या आरोपीस त्याच्या या कृत्यामुळे आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अमेरिकेतील जॉर्जिया येथे राहणाऱ्या केवन वाटकिन्स याने आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या केली आहे. झाले असे कि , इंटरनेटचे स्पीड कमी झाल्याने केवन ने वायफाय चा पासवर्ड बदलला होता, जेणेकरून त्याला स्वतःहालाच याचा फायदा घेण्यात येईल. यानंतर केविन आणि त्याच्या आईमध्ये वाद होऊ लागला .
या भांडणादरम्यान बहीण मध्ये पडल्याने दोघा बहीण -भावांमध्ये चांगलीच लढाई झाली. त्यातच भावाने बहिणीची गळा दाबून हत्या केली. घटनेच्या वेळी आरोपीचे वय १६ तर मृत बहिणीचे वय २० होते. तिचे लग्न झालेले असून तिला एक मुलगा देखील होता.