कुडाळ बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून थेट प्रदेश सरचिटणीस अशी बढती देण्यात आली. परंतु हा निर्णय जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला न विचारता घेतल्याने सुरेश गवस यांनी ते पद नाकारले. परंतु या प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ५२ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. परंतु यावर दोन दिवसात पक्षाच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सुरेश गवस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. सुरुवातीपासूनच आम्ही संघटनेत काम केले. परंतु जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला डावलून पदाबाबत प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने मला जिल्हाध्यक्ष पदावरून हटविणयाचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे ५२ कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या बाबत येत्या दोन दिवसात कुडाळ येथील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीनंतरच राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. असे गवस यांनी सांगितले.
हे पदाधिकारी देणार राजीनामे
प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत (कुडाळ), उदय भोसले (सावंतवाडी), जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम बर्डे (दोडामार्ग), शिवाजीराव घोगळे (कुडाळ), जिल्हा चिटणीस अशोक पवार, तालुका महिला अध्यक्ष रंजना निर्मल (सावंतवाडी), शहर अध्यक्ष सत्यजीत धारणकर (सावंतवाडी), ओबीसी सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर (कुडाळ), प्रफुल्ल सुद्रिक (कुडाळ), विजय कदम, रामभाऊ सावंत, जिल्हा सचिव सतिश पाटकर, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण (वैभववाडी), संदीप पेडणेकर, बावतीस डिसोजा (वेंगुर्ला).