बहुजननामा ऑनलाइन टीम – तरुणीसोबत लग्न लावून दिले नाही तर कुटुंबातील सर्वांनी ठार मारण्याची धमकी देत एका सराईत गुन्हेगाराने एका तरुणावर ब्लेडने वार (beade attack) केले. ही घटना पुण्यातील (pune) सिंहगड रोड परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ(man was stabbed to death) उडाली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला (Criminal) अटक (Arrest) केली आहे.
मयूर राजेंद्र शिंदे (वय-28 रा. नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेत सौरभ जाधव (वय-20 रा. नऱ्हे) हा जखमी झाला आहे. सौरभ जाधव याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ याच्या नात्यात एक मुलगी आहे. त्या मुलासोबत आपले लग्न लावून द्यावे अशी मागणी आरोपीने दोन दिवसांपूर्वी घरी जाऊन केली. त्यावेळी त्याने माझे लग्न मुलीसोबत लावून दिले नाही तर कुटुंबातील एकाही व्यक्तीला जीवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत सौरभ याच्यावर ब्लेडने वार केले. पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.