पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश शैशराज शिंदे (वय ३४, रा. धनकवडी) असे अत्याचार केलेल्याचे नाव असून त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नी बिगारी कामगार असून कामानिमित्ताने कात्रज परिसरात राहायला होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये महिलेचा पती घरी नसताना सुरेश शिंदेने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेने ही माहिती पतीला सांगितली.
तेव्हा त्याने सुरेश शिंदेला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्यामुळे महिलेला धक्का बसला. त्यानंतर तिने नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिलेने फिर्याद दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिंदेला अटक केली.