नवी दिल्ली वृत्तसंस्था : नवी दिल्ली येथे कॅब चालकाने २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी हि शुक्रवारी रात्री मैत्रिणीकडून हॉस्टेलकडे कॅब करून जात होती. कॅब चालकाने तिला नशेचे पदार्थ देऊन बलात्कार केला. पीडिता हि जेएनयू ची विद्यार्थिनी आहे. या घटनेमुळे दिल्लीत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
पीडित तरुण हि जेएनयू मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत होती. ती रात्री आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. पुन्हा हॉस्टेलकडे जाण्यासाठी तिने कॅब पकडली. कॅब चालकाने परिस्थितीचा फायदा घेऊन तिला नशेचे पदार्थ खाऊ घातले आणि वेळ साधून बलात्कार केला. त्यानंतर कॅब चालकाने तीन तास गाडी फिरवत तिला दिल्लीतील एका पार्कजवळील रस्त्यावर फेकून दिले.
रस्त्यावर विचित्र अवस्थेत सापडलेल्या पीडितेला स्थानिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले असता , तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारानंतर विद्यार्थिनी हॉस्टेलला गेली आणि हॉस्टेल अधिकाऱ्यांना घडलेली घटना सांगितली. हॉस्टेल अधिकाऱ्यांनी तिला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपी कॅब चालकाचा शोध घेत आहेत.