• Latest
Shivsena vs devendra fadnavis bjp showing its own inhuman face shiv sena target devendra fadnavis chandrakant patil.

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

October 18, 2021
CM Eknath Shinde | cm eknath shinde told the police that no action should be taken against anyone including mp rajan vikhare and kedar dighe thane news

CM Eknath Shinde | नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

August 15, 2022
Pune Crime | Gangster terror in the name of Appa Londhe The driver was beaten up for asking money for panipuri the stall vandalized

Pune Crime | अप्पा लोंढेच्या नावाने गुंडाची दहशत ! पाणीपुरीचे पैसे मागितल्याने चालकाला मारहाण, स्टॉलची केली तोडफोड

August 15, 2022
PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President's Police Medal

PI Appasaheb Shewale | पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 15, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Monday, August 15, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय
0
Shivsena vs devendra fadnavis bjp showing its own inhuman face shiv sena target devendra fadnavis chandrakant patil.

file photo

मुंबई :बहुजननामा ऑनलाईन –   Shivsena Vs Devendra Fadnavis | गेल्या काही दिवसापासून केंद्रीय तपस यंत्रणांच्या गैरवापराबाबत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या असा आव्हानात्मक पवित्रा घेतला आहे. ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) आडून जे लोक ‘शिखंडी’ पद्धतीचे राजकारण करत आहे त्यांचा बुरखा ठाकरेंनी फाडला आहे. ठाकरे घेतात तेव्हा भाजपनेही आव्हान स्वीकारण्याची मर्दुमकी दाखवायला हवी. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर हल्ला करणे समजू शकतो, पण कुटुंबाचाही छळ करून भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहरा दाखवत आहेत. पूर्वी पडद्यामागे राजकारण केलं जायचं मात्र आता भाजप पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर करत असल्याची जहरी टीका शिवसेनेने (Shivsena Vs Devendra Fadnavis) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

कोणत्याही प्रश्नाचे भाजप (BJP) आणि केंद्र सरकार सामोरे जात नाही. उलट प्रश्न विचारणाऱ्यांना  ते संपवून टाकतात. त्यांना लोकशाही, घटना, कायदा मान्य नाही. विरोधी पक्षाचे ते मुख्यमंत्री स्वीकारत नाही. राजकारणात आणलेला नवा पदरच खूप काही सांगून जात आहे. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच असले त्यांना सुचत आहे. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. त्यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या बेताल बडबडण्यावरून त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे स्पष्ट होते असा टोलाही शिवसेनेने (Shivsena Vs Devendra Fadnavis) लगावला आहे.

काय म्हंटले आहे सामनाच्या अग्रलेखात

दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. या मेळाव्यात पक्षप्रमुख आपले विचार मांडत असतात. पक्षप्रमुखांचे दसरा मेळाव्यातील भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत. ठाकरेंच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून भाजपने बोंब मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे? अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) कोण?

उद्धव ठाकरे हे एक शिवसैनिक आहेत. परकीय देशातील पक्षाचे ते काही सदस्य नाहीत. कोणत्या परिस्थितीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे बहुमत आणि त्यांनी आपला नेता निवडला. शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कडय़ाकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली आहे व त्या घटनात्मक विधीस स्वतः फडणवीस उपस्थित होते. शपथविधीचा झगमगता सोहळा पाहून त्यांचेही डोळे दिपलेच असतील. डोळे (Shivsena Vs Devendra Fadnavis) दिपणे व डोळे फिरणे यात पुन्हा फरक आहे.

महाराष्ट्रामध्ये भाजपचे डोळे फिरले असून जो तिरळेपणा निर्माण झाला आहे. त्यावर उपचारांची गरज आहे. सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर, सूड बाजीवर ठाकरेंनी दसरा मेळाव्यात घणाघात केला आहे. राज्य सरकारांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन केंद्र सरकारने चालवले आहे. राज्यांना काम करू द्यायचे नाही. विशेषतः भाजपचा मुख्यमंत्री नसलेल्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा मुक्त हैदोस घातला जात आहे. सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर भाजपकडून स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. महाराष्ट्रात सीता गमवून दोन वर्षे झाली तरी त्या धक्यातून भाजप सावरलेली दिसत नाही. जे घडलं आहे ते स्वीकारून त्यांनी पुढे योजायला हवं. असे चढ- उत्तर राजकारणात येत असतात. सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे असे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

दसरा मेळाव्यानंतर भाजपचे लोक बेधुंदपणे शिमगा करत आहे. ते योग्य नाही.

हे लोक नशेत बोलत आहेत का? याचा तपास व्हावा. एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते की, एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात.
भाजप पुढाऱ्यांच्या तोंडातून जी मुक्ताफळे बाहेर पडत आहेत त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने याचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल. विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे.‘विश्वास गमावला’ असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे.

विरोधी पक्षाचे हसे होणे हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही.
संसदीय लोकशाहीच्या संकल्पना असलणाऱ्या ‘विरोधी पक्ष’, ‘विरोधी सूर’ केंद्रातील भाजप धुरिणांना मेनी नाहीत, पण महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे.
त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे या मताचे आम्ही आहोत.
महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्यांची चांगली परंपरा आहे.
भाई श्रीपाद अमृत डांगे, उद्धवराव पाटील, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, खडसे, शरद पवार सुद्धा विरोधी पक्षनेते होते.
फक्त बेछूट आणि बेफाम आरोप करायचे व सरकार पाडण्याच्या तारखांचा घोळ करायचा हेच विरोधी पक्षनेत्यांचे काम नसते.

तुमच्या हातात सरकारच्या आयुष्याची दोरी नाही आहे. जेवढे आयुष्य आहे, तेवढे आयुष्य सरकारला मिळणारच आहे.

श्री. फडणवीस म्हणतात की, सरकार कधी गेले हे कळणारही नाही.
पण हा त्यांचा निव्वळ अहंकार आहे. खरे तर फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच त्यांना अजून समजू शकलेले नाही. त्यामुळे फडणवीस किंवा पाटील जे बोलतात ते किती गांभीर्याने घ्यायचे? हा प्रश्नच आहे.
भगवानगडावरून दसऱ्याच्या दिवशीच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सरकार पाडण्याच्या तारखा देणे बंद करा व कामाला लागा, असे सांगितले.
पंकजा बोलल्या तेच भाजपचे अंतस्थ मतप्रवाह असावेत, पण भाजपमध्ये लोकशाहीला स्थान उरले नसल्याने पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यांच्या मतास किंमत उरलेली नाही.
उपऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे राज्य भाजपमध्ये सुरू झाले आहे.
त्यामुळे भाजपचे वर्तमान कठीण आहे, भविष्यकाळ तर त्याहून कठीण आहे.

देशाच्या राजकारणात २०२४नंतर बदल होतील त्यावेळी ईडी, सीबीआय, एनसीबी (NCB) त्यांचे ऐकणार नाहीत. त्यावेळी जर तोंडून फालतूची गांजाफेक केली तर भलत्याच प्रसंगाला सामोरे जावे लागेल. नशेत केलेली वक्तव्ये आणि कृत्ये लोक गांभीर्याने घेत नाहीत.
शरद पवार यांनी स्पष्टपणेच सांगितले आहे की, भाजपला सत्तेचा माज आला आहे.
पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही.

शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून दाखवून दिले असेही शिवसेनेने अग्रलेखात म्हंटले आहे.

 

web title : Shivsena vs devendra fadnavis bjp showing its own inhuman face shiv sena target devendra fadnavis chandrakant patil.

 

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

Pune News | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश

CBSE Datesheet 2021 | येथून डाऊनलोड करू शकता सीबीएसई सत्र-1 वेळापत्रक, सत्र-2 परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये

Pune Crime | पुण्यात भाईगिरी ! जेलमध्ये असतानाची हप्ता वसुली बुडाली; कारागृहातून बाहेर आल्यानंतर पान टपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न

Tags: Bhai Shripad Amrit DangeBJPcbiCentral governmentCentral Investigation SystemsChandrakant Patilcm uddhav thackerayDatta PatilDemocracyDevendra FadnavisDrugsDussehra gatheringsedForeign country partyGanjapurangopinath mundeKhadselatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra PoliticalLokmanya Tilakmaha vikas aghadiMaharashtraMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathimanohar joshiMisuse of Central Investigation SystemsNCBoppositionpankaja mundeParliamentary democracypeople of Maharashtrapoliticssamnasharad pawarshiv sena target devendra fadnavisshivsainikShivsena Vs Devendra FadnavisSpeech traditionsState Governmentstoday's Maharashtra Political newsUddhavrao Patilउद्धव ठाकरेउद्धवराव पाटीलकेंद्र सरकारखडसेगांजापुराणगोपीनाथ मुंडेदत्ता पाटीलद्रकांत पाटीलपंकजा मुंडेभाई श्रीपाद अमृत डांगेभाजपमनोहर जोशीमहाराष्ट्रमहाविकास आघाडीमुख्यमंत्रीराजकारणलोकमान्य टिळकलोकशाहीशरद पवारशिखंडीशिमगाशिवसैनिकसंसदीय लोकशाहीसामना
Previous Post

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

Next Post

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

Related Posts

CM Eknath Shinde | cm eknath shinde told the police that no action should be taken against anyone including mp rajan vikhare and kedar dighe thane news
इतर

CM Eknath Shinde | नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

August 15, 2022
PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President's Police Medal
ताज्या बातम्या

PI Appasaheb Shewale | पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 15, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral
ताज्या बातम्या

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting
ताज्या बातम्या

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Next Post
nitesh rane nitesh rane critisized sanjay raut on ganja

Nitesh Rane | 'मालकाच्या घरीच 'गांजाचा बादशाह' - नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In