नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shivsena | शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी बंडखोर शिंदे (CM Eknath Shinde) गटाला आव्हान दिले. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. शिंदे गटाने शिवसेना पक्षावरच हक्क सांगितल्याने आणि राज्याच्या विधानसभेने सुद्धा यास अनुमती दिल्याने सध्या शिवसेनेत संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे आव्हान शिंदे गटाला दिले आहे. (Shivsena)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राऊत म्हणाले, शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही. विधीमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, शहरांमध्ये शिवसेना आजही तीच आहे. काही लोक सोडून गेले म्हणून शिवसेना कमजोर झाली, असे म्हणणे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अपमान आहे. या राज्याची जनता ही बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कधी सहन करणार नाही. (Shivsena)
संजय राऊत म्हणाले, विधीमंडळातील लढाया चालूच राहतील. ज्याच्या हाती ससा तो पारधी, याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे. विधीमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून ज्याला बसवले जाते तो सत्ताधारी पक्षाचा माणूस असतो आणि तो त्यांच्या पद्धतीने निर्णय घेत असतो. मग राज्यसभा असो, लोकसभा असो किंवा मग विधानसभा असो.
राऊत पुढे म्हणाले, पक्षाच्या विरुद्ध बाहेर कारवाया केल्या, राज्यसभेत नाही, संसदेत नाही म्हणून शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. बाहेर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल. शरद यादव आणि अन्य काही लोकांचे निलंबन केले. उपराष्ट्रपती असलेले राज्यसभेचे चेअरमन असलेले व्यंकय्या नायडू यांनी. तो नियम आम्ही जेव्हा महाराष्ट्रच्या विधीमंडळात लावायला गेलो. तेव्हा आम्हाला तो न्याय मिळाला नाही. हे कितपत योग्य आहे ?
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राऊत म्हणाले, विधीमंडळ आणि संसदेसाठी कायदा सगळ्यांसाठी समान असेल तर एका ठिकाणी एक न्याय, दुसर्या ठिकाणी दुसरा न्याय सोयीप्रमाणे जो सत्तेवर आहे, जो खुर्चीवर आहे त्याने त्याच्या मर्जीने न्याय द्यायचा.
याला मी संसदीय लोकशाही मानत नाही. या संसदीय लोकशाहीला वेळेनुसार मालक बदलत जातो आणि निर्णय होत असतात.
सध्या महाराष्ट्रात तेच सुरू आहे.
राऊत म्हणाले, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक निर्णय दिला, की 16 आमदारांनी व्हीप झुगारला हे त्यांनी एकदा जाहीर केल्यावर त्या खुर्चीवर आलेल्या दुसर्या अध्यक्षाने निर्णय बदलला.
कारण, ते दुसर्या पक्षाचे नेते होते. हे काय रामशास्त्रींचे राज्य नाही. विधीमंडळाच्या नियमांचे पालन केले असे मी मानत नाही.
ही राजकीय चढाओढ आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला यातून काय मिळणार आहे ?
बंडखोर शिंदे गटाला सुनावताना राऊत म्हणाले, मूळ पक्ष शिवसेना आहे. आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला आहात. शिवसेना पक्षाने आपल्याला निवडून आणण्यासाठी शर्थ केलेली आहे. आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलला आहात. तुमचा पक्ष खरा कसा असू शकतो ? हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि मग कायद्याला विचारा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अगोदर तुमच्या मनाला विचारा की आम्ही खरोखर शिवसेनेचे सदस्य किंवा आमदार आज राहिलो आहोत का ? हा प्रश्न खरे म्हणजे विधानसभा अध्यक्षांना देखील पडला पाहिजे आणि विधीमंडळ सचिवालयाला पडला पाहिजे.
पण शेवटी मगाशी मी जसे म्हणालो ज्याच्या हाती ससा तो पारधी, असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताना म्हटले की, आम्ही नक्कीच कायदेशीर लढाई लढू.
कायदेशीर लढाई लढावीच लागेल.
11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात त्या संदर्भात एक महत्वाची सुनावणी आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका प्रलंबित असताना, अशाप्रकारे विधीमंडळात निवडणुका घेणे बेकायदेशीर आहे.
जोपर्यंत 11 तारखेचा निकाल लागत नव्हता, तोपर्यंत अशा प्रकारची निवडणूक घेणे हे घटनाबाह्य आहे.
ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेणे गरजेचे होते.
राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधीमंडळात नक्कीच आमच्या पक्षात फूट पडलेली आहे.
काही लोकांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे.
ती भूमिका त्यांनी का घेतली ? हा प्रश्न त्यांनाही पडला असेल.
कोणत्या परिस्थितीत घेतली.
ज्या पद्धतीने सभागृहात ईडीच्या नावाने गर्जना सुरू होत्या त्यावरून आपल्याला कळले असेल की हा निर्णय वर पासून खालपर्यंत का घेण्यात आला.
पण आम्हाला याची पर्वा नाही. आम्ही अशा प्रसंगांना घाबरत नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shivsena | shiv sena is not ukraine no group can take control of shiv sena leader and MP sanjay raut
हे देखील वाचा :