नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायावती माझी आणि मुलायमजींची बहीण नाही. तर मग अखिलेश यादवची आत्या कशी काय होईल. अशा शब्दात प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) प्रमुख शिवपाल यादव यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर खरमरीत टीका केली.
त्याचबरोबर शिवपाल यादव यांनी आपला पुतण्या अक्षय च्या विरोधात फिरोजाबाद मधून खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. यामुळे राजकीय पटलावर यादव घराणेशाहीचे वाद मिटण्याची लक्षणे दिसत नाहीत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये अलीकडेच सपा आणि बसपा युती झाल्यामुळे राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला असल्याचे दिसते आहे.