सातारा : बहुजननामा ऑनलाइन – साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी काल गोडोली येथील दांडियाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ या गाण्यावर भन्नाट डान्स करत दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना कॉलर उडवण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते, अशी प्रतिक्रिया देत खा. उदयनराजेंना (Udayanaraje Bhosale) टोला लगावला आहे. (Shivendra Raje Bhosale)
गोडोली (Godoli) येथे एका मंडळाने दांडियाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंना (Shivendra Raje Bhosale) आमंत्रित करण्यात आले होते. तिकडच्या कार्यकर्त्यांचा मान राखत शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. शिवेंद्रराजे तेथे आल्यानंतर तरूणांमध्ये एकच उत्साह संचारला. यावेळी शिवेंद्रराजे यांची एंट्री होताच ‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ हे गाणे वाजवण्यात आले. मग काय तरूणांसोबत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या गाण्यावर ठेका धरला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डान्स केल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी दांडिया खेळण्याचाही आनंद लुटला.
‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ या गाण्यावर खा. उदयनराजेंनी अनेकदा कॉलर उडवली आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंना डान्स करताना कॉलर उडवण्याची विनंती केली.
मात्र, शिवेंद्रराजेंनी याला नकार देत आपली कॉलर आपल्या मानेवर चांगली दिसते असे बोलत उदयनराजेंना टोला लगावला आहे.
Web Title :- Shivendra Raje Bhosale | Your collar looks best on your neck Shivendraraje bhosale to Udayan raje bhosale
हे देखील वाचा :
Pune Crime | खडकीच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणार्यांना शिवाजीनगर परिसरातून अटक
NCP | भाजपकडून शिंदे गटाला ‘रसद’, दसरा मेळाव्यासाठी दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा आरोप