मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजपच्या युतीची दिलजमाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ जागी लढणार आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेच्या अटी नुसार भाजपने विधानसभेचे जागा वाटत पूर्ण केले आहे. भाजप १४५ जागी तर शिवसेना १४३ जागी लढणार आहे. या जागा वाटपानुसार भाजपचं दोन्ही निवडणुकीत मोठा भाऊ असणार आहे.
मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपचे बडे नेते या युतीच्या फॉर्मुल्यावर शिक्का मोर्तब करणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याची हि सूत्रांनी सांगितले आहे.
भाजपने जिंकलेल्या पुणे विधान सभा मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा असल्याचे हि वृत्त समोर आले आहे. तसेच नाशिक मतदारसंघातील भाजपच्या ताब्यात असणाऱ्या विधानसभेच्या जागा ताब्यात घेण्याची शिवसेनेने रणनीती आखली आहे. एकंदरच शिवसेनेने भाजपशी युतीला राजी होण्यासाठी संपूर्ण शरणागती पत्करायला भाग पाडले आहे.