बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर(Shirur) तालुक्याच्या डिंग्रजवाडी येथील आयटीडब्ल्यू कंपनीमध्ये माल घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकास दमबाजी करून परत दिसला तर मारून गाडी फोडून टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिंग्रजवाडी ता. शिरूर(Shirur) येथील आयटीडब्ल्यू या कंपनीमध्ये कुरुळी येथून माल घेऊन येणारा टेम्पो चालक नितीन खिलारे हा त्याच्या ताब्यातील एम एच १४ जि डी ४१५८ हा टेम्पो घेऊन कंपनीमध्ये आला होता, कंपनीतील माल खाली करून तो पुन्हा जात असताना कंपनीच्या बाहेर दुचाकीहून आलेल्या दोघांनी चालकाला अडविले आणि टेम्पोची चावी काढून घेऊन टेम्पो मालकाला फोन करण्यास सांगितले, त्यावेळी खिलारे याने टेम्पो मालकाला फोन लावला असता खिलारे याने मालकाला फोन लावल्यानंतर पुन्हा त्यातील एका युवकाने मोबाईल घेऊन मी अमित गव्हाणे बोलतोय, गाडी कशाला पटवून दिली, पुन्हा गाडी पाठवली तर ड्रायवरला मारून गाडी फोडणार अशी धमकी दिली, त्यांनतर अमित गव्हाणे हा टेम्पोमध्ये बसला आणि त्याने टेम्पोचालकाला टेम्पो चालवायला लावून टेम्पो पेरणेफाटा येथे घेऊन जात तेथे एका ऑफिसमध्ये चालकाला नेले आणि चालकाचा मोबाईल व चावी काढून घेतली काही वेळाने अमित याने चालकाला चावी व मोबाईल देऊन जाण्यास सांगितले, त्यांनतर चालक खिलारे याने पुन्हा टेम्पो मालकाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले, याबाबत टेम्पो चालक नितीन दलित खिलारे रा. कुरुळी ता. खेड जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राष्ट्रवाडी विद्यार्थी काँग्रेसचा शिरूर तालुकाध्यक्ष अमित गव्हाणे रा. डिंग्रजवाडी ता. शिरूर जि. पुणे याचे सह त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे हे करत आहे.