Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

Shimron Hetmyer | shimron hetmyer says there are two sides to coin after west indies cricket board dropped him from world cup squad over missed flight

बहुजननामा ऑनलाइन –  वेस्ट इंडीज क्रिकेटने (West Indies Cricket) त्यांचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरला (Shimron Hetmyer) विश्वचषक टीम मधून बाहेर काढले आहे. हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी (Austrelia) जाणारं विमान चुकवल्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेटने हि कारवाई केली आहे. यानंतर हेटमायरने (Shimron Hetmyer) त्याची पार्टनर निरवानी हिची इन्स्टाग्राम स्टोरी (Instagram Story) रिपोस्ट केली. यामध्ये ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ असे लिहिण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय लिहिले आहे इन्स्टा स्टोरीमध्ये ?

 

हेटमायरची पत्नी निरवानी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘प्रत्येक गोष्टीची वेगळी दुसरी बाजूही असते.’ तसंच तिने लिहिलं आहे की, ‘ज्या काही गोष्टी अंधारात आहेत, त्या बाहेर आल्या पाहिजेत. ‘दरम्यान निरवानीची हीच स्टोरी शिमरॉननेही आपल्या इन्स्टाग्रामवर रिपोस्ट केली आहे. त्यामुळे शिमरॉनलाही कोणत्यातरी कारणामुळे विमान पकडता आलं नसावं अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

काय घडले नेमके?

 

वर्ल्डकपसाठी जेव्हा वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा हेटमायरचा (Shimron Hetmyer)
देखील समावेश करण्यात आला होता. यानंतर हेटमायरने कौटुंबीक कारण देत त्याची फ्लाइट रीशेड्यूल केली होती.
यानुसार, हेटमायर 1 ऑक्टोबरच्या ऐवजी 3 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासाठी जाणारे विमान पकडणार होता.
त्याच्यासाठी क्रिकेट बोर्डाने एक सीट देखील बुक केली होती.
यानंतर हेटमायरने रीशेड्यूल केलेली फ्लाइट पकडू शकत नसल्याची कल्पना क्रिकेट वेस्ट इंडिजला दिली.
यानंतर निवड समितीने हेटमायरच्या जागी ब्रूक्सचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला.

 

टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ: (West Indies Squad for T20 World Cup) निकोलस पूरन
(कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शमरह ब्रूक्स, जेसन होल्डर,
अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेड मॅकॉय, रेयॉन रेफर, ओडियन स्मिथ.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Shimron Hetmyer | shimron hetmyer says there are two sides to coin after west indies cricket board dropped him from world cup squad over missed flight

 

हे देखील वाचा :

Amravati ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना उपविभागीय अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

IND vs PAK आज होणार सामना, कधी आणि कुठे होणार मॅच, जाणून घ्या

Rahkeem Cornwall | वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूने रचला इतिहास, T-20 मध्ये केली डबल सेंच्युरी

Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | ‘धनुष्यबाण’ कोणाचे? अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिले महत्वाचे संकेत, निकाल देताना आमदार, खासदारांची संख्या, प्रतिज्ञापत्रांचाही विचार होणार का?