Rahkeem Cornwall | वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूने रचला इतिहास, T-20 मध्ये केली डबल सेंच्युरी
बहुजननामा ऑनलाइन – Rahkeem Cornwall | वेस्ट इंडिजचा (West Indies) फलंदाज रहकिम कॉर्नवालने (Rahkeem Cornwall) T-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) इतिहास रचला आहे. त्याने T-20 क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक (double century) झळकविण्याचा मान पटकावला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याच खेळाडूला जमली नाही. 29 वर्षांच्या रहकिमने बुधवारी रात्री अटलांटा खुल्या T-20 लीगमध्ये अटलांटा फायरकडून (Atlanta Fire) खेळताना 205 धावा केल्या. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 22 षटकार लगावले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोण आहे हकिम कॉर्नवाल?
रहकिमने तीन वर्षांआधी भारताविरुद्ध (India) विंडीज संघात पदार्पण केले होते. त्याच्या लठ्ठपणामुळे त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी त्याचे वजन 140 किलो व उंची 6.6 फूट होती. रहकिमच्या या खेळीच्या जोरावर अटलांटा फायरने हा सामना 172 धावांनी जिंकला. या सामन्यात अटलांटाने 20 षटकात 1 बाद 326 धावा केल्या. या सामन्यात स्टीव्हन टेलरने (Steven Taylor) 18 चेंडूत 5 षटकार व 5 चौकारांसह 53 धावा केल्या.
समी असलमने 29 चेंडूत 53 धावा केल्या.
यानंतर प्रत्युत्तरदाखल उतरलेल्या स्क्वेअर ड्राईव्ह संघाने 20 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. (Rahkeem Cornwall)
रहकिम वेस्ट इंडिजकडून केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. तो स्थानिक T-20 लीग खेळतो.
रहकिमने 66 T-20 सामन्यात आतापर्यंत 147.49 च्या सरासरीने 1146 धावा केल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Rahkeem Cornwall | 140 kg rahkeem Cornwall double hundred blast in t20
हे देखील वाचा :
Arun Bali Passed Away | दुःखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे 79 व्या वर्षी निधन
Comments are closed.