Pune Crime | दीड कोटीच्या फसवणुक प्रकरणात अ‍ॅड. सतीश मुळीक, अग्रजीत मुळीक, जितेंद्र भोसले, राम भुजबळ यांच्यावर FIR

 Nashik Crime News | nashik the three together cheated a woman of 20 lakhs

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  Pune Crime | जमिनीच्या व्यवहारातून आलेल्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक (Fraud Case) केल्या प्रकरणी पुण्यातील अ‍ॅड. सतीश मुळीक (Adv. Satish Mulik) यांच्यासह चार जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2006 आणि 7 जून 2022 मध्ये घडला आहे. दरम्यान मागिल महिन्यात देखील अ‍ॅड. मुळीक यांच्यावर 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अ‍ॅड. सतीश गजानन मुळीक (वय-50), अग्रजीत मुळीक Agarjit Mulik (वय-22), जितेंद्र भोसले Jitendra Bhosale (वय-28), राम भुजबळ (Ram Bhujbal) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कैलास बबन पठारे Kailas Baban Pathare (वय-55 रा. पठारेनगर, थिटे वस्ती, खराडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.6) फिंर्य़ाद दिली आहे. पठारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPC 406, 420, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास पठारे यांनी खराडी येथील त्यांच्या 3 हे. 32 आर जागेतील 79 आर क्षेत्र स्वस्तिक डेव्हलपर्स (Swastik Developers) यांना अ‍ॅग्रीमेंट करुन दिले. या व्यवहारातून पठारे यांना 1 कोटी 35 लाख रुपये रक्कम मिळाली होती. पठारे हे मिळालेली रक्कम मोजण्यासाठी अ‍ॅड. सतीश मुळीक यांच्या घरी गेले होते. रात्र झाल्याने अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी पठारे यांना रक्कम घरी ठेवण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पठारे यांनी जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली रक्कम मुळीक यांच्या घरी ठेवली.

 

पठारे हे पैसे घेण्यासाठी गेले असता अ‍ॅड. मुळीक यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तर इतर आरोपींनी फिर्यादी कैलास पठारे यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आळेकर (API Alekar) करीत आहेत.

दरम्यान, जमीनीच्या केसमध्ये कोर्टामध्ये आवश्यक तडजोड करण्यासाठी 15 लाख रुपये घेऊन कोर्टात केस योग्यरित्या न लढविता फसवणूक केल्या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अ‍ॅड. सतीश मुळीक यांच्या विरोधात चंद्रशेखर गलांडे (Chandrasekhar Galande) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | In the fraud case of one and a half crores, Adv. FIR against Satish Mulik, Agrajit Mulik, Jitendra Bhosale, Ram Bhujbal

 

हे देखील वाचा :

HDFC Bank | एचडीएफसी बँकेने व्यापाऱ्यांसाठी लाँच केले स्मार्टहब व्यापार; सर्व बँकिंग आणि व्यवसाय समाधानांसाठी वन-स्टॉप व्यापारी समाधान अ‍ॅप

Sandeep Lamichhane | IPL खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde | चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले – ‘आधी पक्ष फोडला आणि आता घर फोडण्याचं काम सुरुय’