मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde | बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र जयदेव ठाकरे (Jaydev Thackeray) यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील (BKC Ground) दसरा मेळाव्याला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खुर्चीवर जयदेव ठाकरे बसले होते. त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन भाषणही केले. ते म्हणाले, एकनाथला कधीच एकटा नाथ होऊ देऊ नका ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. (Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, आधी पक्ष फोडला, आता घर फोडण्याचे काम सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणात लोक उठून जात होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सर्व काही जिंकले.
दरम्यान, जयदेव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, एकनाथ हा माझा खूप आवडीचा. आता तो मुख्यमंत्री झालाय त्यामुळे एकनाथराव असे म्हणावे लागेल. मला चार-पाच दिवस झाले मला फोन येताहेत तुम्ही शिंदे गटात गेलात काय? असे विचारत होते. मी काही कुणाच्याही गोठ्यात दावणीला बांधला जाणारा नाही.
पण एकनाथ शिंदेंनी चार-पाच निर्णय घेतले ते खरंच चांगले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे.
जयदेव ठाकरे म्हणाले, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकनाथ शिंदेंना एकटे पाडू नका.
त्यांना एकटानाथ होऊ देऊ नका. यावेळी मी एक गोष्ट सांगेन की सगळे बरखास्त करा.
परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde | former mp chandrakant khaire has criticized chief minister eknath shinde
हे देखील वाचा :