मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात काही दिवसांपूर्वीच सिंगर मिका सिंगने परफॉर्म केलं होतं. यानतंर मिकाला देभरातील लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मिकाला बॅन केलं होतं. त्याने माफी मागितल्यानंतर त्याच्यावरील बॅन हटवण्यात आला होता. यानंतर आता बिग बॉसची एक्स स्पर्धक आणि विनर शिल्पा शिंदेने मात्र मिकाचे समर्थन केले आहे. इतकेच नाही पाकिस्तानात परफॉर्म करणार असल्याचं ओपन चॅलेंजही तिने दिलं आहे.
शिल्पा शिंदेने मिकाचा व्हिडीओ शेअर करत त्याला सपोर्ट करत म्हटले आहे की, त्याला घाबरण्याची गरज नाही. त्याने जे काही केलं आहे ते बरोबर आहे. मिकाने माफी मागितल्याचा शिल्पाला राग आला आहे. शिल्पा म्हणाली की, “मी या गोष्टीमुळे हताश आहे की, कोणताही क्राईम केला नसतानाही मिकाने माफी मागितली आहे. मी हे समजू शकते की, किती प्रेशरमध्ये येऊन मिका सॉरी बोलला आहे.”
शिल्पा म्हणाली की, “मला या फेडरेशन्सना विचारायचे आहे की, कोणतीही लीगल बॉडी नसताना यांना कोणी अधिकार दिला की ते एका कलाकारावर इतका दबाव देतील की, त्याला सॉरी बोलावं लागेल. माझ्यासोबतही असेच झाले होते परंतु मी मागे नव्हते हटले. आज मी अशा कोणत्याही फेडरेशनला जोडलेली नाही. मला सतत कामं मिळत आहेत. अशा लोकांसोबत काम करण्याचा माझा निर्णय बरोबर ठरला आहे.”
शिल्पा पुढे म्हणाली की, “मला मिकाला यासाठी सपोर्ट करायचा आहे कारण मला वाटतं की, दादागिरी संपावी. मला लोकांना सांगायचं आहे की, असा कोणताही कायदा नाही जो कलाकाराला काम करण्यापासून अडवेल. मला नाही माहीत परत तो पाकिस्तानात सादर करायला जाईल किंवा नाही परंतु मी लवकरच पाकिस्तानसाठी व्हिसा अप्लाय करणार आहे. तिथे जाऊन शोमध्ये काम करणार आहे. मला पाहायचं आहे की, कोण मला अडवतं. मी या गोष्टीला घेऊन खूप सीरीयस आहे.”
शिल्पा म्हणाली की, “जर मला यासाठी काही स्ट्रिक्ट अॅक्शन घ्यावी लागली किंवा लढाई करावी लागली तर मी नक्कीच करेन. आपण स्वत:ला स्वतंत्र समजतो परंतु खरंच आपण स्वतंत्र आहोत का ?”