Sheezan Khan | शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वसई न्यायालयाने दिले आदेश

बहुजननामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला (Sheezan Khan) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वसई न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर (Sheezan Khan) लावण्यात आला आहे. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Tunisha death: Police to produce accused Sheezan Khan in court
Read @ANI Story | https://t.co/CKp5kvWsGj#TunishaSharma #TunishaSharmaDeath #SheezanKhan pic.twitter.com/nfQzc6HPiq
— ANI Digital (@ani_digital) December 31, 2022
वालीव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी शिझानच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. शिझानला त्याचं गुगल अकाऊंट (Google Account) आणि मेल आयडीचा पासवर्ड आठवत नव्हता पण तपासासाठी पोलिसांना त्याचं इमेल (Email Id) अकाऊंट चेक करायचे होते. म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी शिझानला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. “गेल्या सात दिवसांपासून शिझान पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याचा फोनदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्यामुळे वसई न्यायालयाने शिझानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे”.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
छोट्या पडद्यावरील Tv अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती.
तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील मेकअप रूममध्ये तिने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला होता.
या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी तुनिषाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली होती.
Web Title :- Sheezan Khan | sheezan khan remanded to 14 days judicial custody orders of the vasai court for tunisha sharma case
हे देखील वाचा :
Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती
Comments are closed.