पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | जेजुरी एमआयडीसीमधील (Jejuri MIDC) बर्जर पेन्टच्या (Berger Paints) कंपनीमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामध्ये एका कामगारचा मृत्यू झाला आहे तर दुसरा एक जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Pune Crime News)
रोहित जयवंत माने (28, रा. सुर्वे वस्ती, राख) असे स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जेजुरी एमआयडीसीमध्ये असलेल्या बर्जर पेन्टच्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. कंपनीत अचानकपणे एकच गोंधळ उडाला. स्फोटात जखमी झालेला रोहित सुमारे 90 टक्के भाजल्याने त्यास तात्काळ पुण्यातील ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्फोटामध्ये रोहितला त्याचा जीव गमवावा लागल्याने कंपनीतील कर्मचारी संतप्त होते. स्फोटातील मयताच्या कुटुंबियांना कंपनीने मदत द्यावी म्हणून कामगारांनी आंदोलन करू. कंपनीच्या बेजबाबदार अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रोहित मानेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस (Pune Rural Police) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Blast at Berger Paint Company in Jejuri MIDC, worker dead
हे देखील वाचा :
Sheezan Khan | शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वसई न्यायालयाने दिले आदेश
Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती