मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. अनेकांनी त्यांची पाठराखण केली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी आपण ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारणार आहे, असं सांगितलं होतं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार ईडीच्या कार्यालयात पोहोचण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे की, शरद पवारांना चौकशीला बोलावल्यानंतरच त्यांनी ईडी कार्यालयात यावे. कारण शरद पवार आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत ते ठरवु शकत नाही.
आज ते स्वतः च ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली चौकशी करा अशी मागणी करणार आहेत. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे गृह मंत्रालयाची नजर आहे. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली.
परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान कार्यालय परिसरात कोणत्याही कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शांतता राखली जाईल याची काळजी घेण्यात यावी. पोलीस प्रशासन आणि इतर सहकारी यंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
Visit : bahujannama.com