पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Sharad Pawar |राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सर संघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मुंबईमधील (Mumbai) एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एकच आहेत. असं विधान केलं होतं. या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडलीय, अशी प्रतिक्रिया देत पवार यांनी टोला लगावला आहे.
सर संघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, सर्व धर्म एकच समजतात तर, हे दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला आहे. सर्वांचं मुळ एकच ही माझ्याही ज्ञानात भरच पडली आहे, असं म्हणत शरद पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले होते मोहन भागवत?
सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. सोमवारी ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी या संस्थेच्या वतीने आय़ोजित केलेल्या राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी या विषयावर मोहन भागवतांनी आपली भूमिका मांडली आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एक आहेत. देश पुढे जायचा असेल तर सर्वांना सोबत जावे लागले. आमच्यासाठी हिंदू हा शब्द आहे, मातृभूमी, गौरवशाली परंपरा आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे. असं त्यांनी म्हटलं होतं.
web title: Sharad pawar sharad pawar taunts rss chief mohan bhagwat over his statement of hindus muslims in india have same ancestors.
Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा
Maharashtra Lockdown | …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित?; सध्या दैनंदिन बाधितांची संख्या 4 ते 5 हजार
Kopardi Rape Case | कोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती