बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्या बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी चित्रपट ‘पठाण’मुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दीपिका आणि शाहरुख यांच्यातला हॉट अंदाज पाहून चाहते चांगलेच आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. ‘बेशरम रंग’ असे गाण्याचे बोल असून, हे गाणे प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे दिसत आहे. त्यातच आता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असल्याने पुन्हा एकदा शाहरुख चर्चेत आहे.
हा व्हिडिओ जेव्हा शाहरुख खानने ‘झिरो’ चित्रपटादरम्यान एका कार्यक्रमात मुलाखत दिली, त्या वेळेचा आहे. त्यावेळी शाहरुखने देशातील असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केले होते. त्याच्या वक्तव्यामुळे जनता चांगलीच पेटली होती आणि त्याची ही मुलाखत चांगली गाजली होती. या मुलाखतीनंतर शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. यावेळी शाहरुखने त्याच्या एका वाईट सवयीबद्दलदेखील खुलासा केला होता. धूम्रपान ही त्याची वाईट सवय असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्या मुलाखतीत जेव्हा शाहरुखला (Shah Rukh Khan) त्याने एका चाहत्याला दिलेले वचन आठवण करून देण्यात आले. त्यावेळी शाहरुखने अगदी मजेशीर असे उत्तर देत म्हणाला होता की,
“मी सध्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असल्याने मला काही गोष्टी खरंच लक्षात राहत नाहीत.
मला अनेक गोष्टींचा विसर पडत चालला आहे.
मला माहीत आहे की, धूम्रपान करणे धोक्याचे असते, त्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
मी सिगारेटचे व्यसन कमी करण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि लवकरच मी ती सोडेनदेखील.
माझी मुलंदेखील मला याबद्दल सांगत असतात.
आता मी लवकरच यातून बाहेर पडणार आहे”,
तर आता तब्बल तीन वर्षांनी शाहरुख खान पठाण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,
तर हा चित्रपट 25 जानेवारी 2023 दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan old interview clip viral actor says people hates him because of one bad habit
हे देखील वाचा :
Pune Crime | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ व्यावसायिकाला घातला 11 लाखांचा गंडा
Indian Navy | भारतीय नौदलात आता महिलाही होऊ शकतात मार्कोस कमांडो
Nitesh Rane | ‘जो गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या …;’ नीतेश राणेंनी दिली धमकी