बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे-सोलापूर महामार्गावरील त्रिमूर्ती हॉटेलवर( Trimurti Hotel) पोलिसांना छापा ( Raid) टाकून सेक्स रॅकेटचा ( Sex Racket) पर्दाफाश केला आहे. यवत पोलिसांनी छापेमारी तत्काळ केली असून, यामध्ये मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांना अटक ( Arrest) केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दौंडमधील बोरीभडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस ( Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या पथकाने त्रिमूर्ती हॉटेलवर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलचालक प्रभाकर गोपाल शेट्टी व अन्य दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.
यापूर्वीही एका हॉटेलवर झाली होती कारवाई
यापूर्वी पोलिसांनी मागील आठवड्यात पुणे-सोलापूर महामार्गावरील पांढरेवाडी गावाच्या हद्दीत अनुराधा हॉटेल येथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती तर 3 महिलांची सुटका केली होती. त्यावेळी याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली होती. या घटनेबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडीक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना दिली. पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केल्यानांतर ही माहिती खरी ठरली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत तीन महिलांची सुटका केली होती. यामध्ये दोन पश्चिम बंगालच्या होत्या तर एक महाराष्ट्रातील होती.