बहुजननामा ऑनलाइन टीम – पेरुमध्ये सुरु असलेल्या चिनी कोरोना लशीच्या ट्रायलला स्थिगिती दिल्याचे वृत्त (china-covid-19-vaccine-
पेरु सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकावर झालेला प्रतिकूल परिणाम लशीमुळे झाला की त्याला अन्य काही कारणे आहेत, याचा तपास सुरु आहे. सिनोफार्म कंपनीच्या लशीच्या ट्रायलमध्ये पेरुमध्ये जवळपास 12,000 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. पुढच्या काही दिवसात या लशीच्या ट्रायलचा पहिला टप्पा पुर्ण होणार होता. मात्र गंभीर घटनेमुळे क्लिनिकल ट्रायलला स्थिगिती दिली आहे. कायतानो हेरेडिया युनिवर्सिटीचे मुख्य शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकांवर अन्य काही लक्षणाशिवाय दोन्ही पाय अशक्त झाल्याचा प्रकार घडला आहे.
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. जग कोरोनाच्या जाळ्यात सापडत असताना चीनमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या एका शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.