बहुजननामा ऑनलाइन टीम –
मेष
दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामात आत्मविश्वास वाढेल. पूजाविधित मन लागेल. एखाद्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्याल. घरात शांतता राहील. खर्च वाढेल. मानसिक ताण वाढू शकतो. विरोधकांपासून सावध राहा.
वृषभ
आपल्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होईल. आरोग्य चांगले राहील. जोडीदार रागाने बोलू शकतो. कुटुंबात तणाव वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. मनात मित्रांना भेटण्याची इच्छा होईल. प्रेमसंबंधात आनंद लाभेल.
मिथुन
कामावर लक्ष केंद्रित कराल. कुटुंबालाही वेळ ÷द्याल. दोघांमध्ये संतुलन निर्माण करण्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात समन्वय चांगला राहील. स्वत:ला सर्वोत्कृष्ट समजण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाशी चांगले वागा. आरोग्य कमजोर होऊ शकते. घरात आनंद राहील.
कर्क
भाग्याच्या साथीने दिवसाची सुरूवात कराल. काही खर्च अचानक समोर येतील, जे लक्ष वेधून घेतील. कामाची चिंता होणार नाही. कामाला बळकटी येईल. वैवाहिक जीवन असो की, प्रेमसंबंध, आज चांगले परिणाम मिळतील.
सिंह
एखाद्या गोष्टीवरून तणाव जाणवेल. त्याचा कामावरही परिणाम होईल, ज्यामुळे कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाचे अनुसरण करू नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. खर्च होईल, पण उत्पन्न सुद्धा चांगले राहील. मुलांकडून आनंद मिळेल.
कन्या
व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित कराल. नवीन लोकांशी संवाद साधाल. कौटुंबिक जीवनासाठी दिवस आनंदाचा आहे. जोडीदाराच्या आनंदासाठी काही चांगले काम कराल. उत्पन्न चांगले मिळेल. बुद्धिमत्ता वापरुन कामात यश प्राप्त कराल.
तुळ
कामाचा ताण मनावर असेल, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. कामात कोणाशीही ईकडच्या-तिकडच्या गोष्टी बोलू नका. काम करत रहा. उत्पन्न चांगले मिळेल. सरकारकडून फायदा मिळू शकतो. व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. वैयक्तिक जीवनात थोडा तणाव असेल.
वृश्चिक
आजचा दिवस बुद्धीत ताजेपणा आणेल. काहीतरी नवीन विचार करण्याची इच्छा होईल. प्रेमसंबंधात एक नवीन ताजातवाणा दिवस असेल. खूप बोलाल. उत्पन्न चांगले होईल. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कामासाठी दिनमान तुमच्या हातात असेल.
धनु
आज कुटुंबातील सदस्यांची मने जिंकण्याचा दिवस आहे. संपूर्ण दिवस त्यांच्याबरोबर घालवाल. कामावरही लक्ष केंद्रित करा आणि क्षमतेद्वारे स्वत:ला सिद्ध करा. मनात चांगले विचार येतील. इतरांना मदत करण्याची इच्छा होईल. भाग्य साथ देईल. उत्पन्न चांगले होईल. वैयक्तिक सुखाच्या काळाची जाणीव होईल.
मकर
मित्रांसह दिवस घालवण्यास आवडेल. एखाद्या कामासाठी त्यांचा सल्ला घ्याल. पूजाविधीसाठी खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिती मजबूत राहील. वैयक्तिक जीवनात प्रेम आणि आनंदाचे वातावरण असेल. रिअल इस्टेटच्या बाबतीत दिवस चांगला जाईल.
कुंभ
आजचा दिवस धनप्राप्तीसाठी कशाप्रकारे मार्गी लावावा यावर विचार कराल. आरोग्य थोडे कमजोर होईल. उत्पन्न चांगले राहील. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे कामामध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते. प्रेमसंबंधात दिवसाचा आनंद घ्याल.
मीन
स्वताकडे लक्ष द्याल. मनात आत्मविश्वास राहील. चेहर्यावर हास्य राहील. कौटुंबिक जीवनासाठी दिवस आनंदाचा असेल. वैवाहिक जीवनात तसेच प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. काम थोडे काळजीपूर्वक करा. तुमची दुर्बलता कोणालाही सांगू नका. उत्पन्न चांगले मिळेल.