मुंबई बहुजननामा : सर्वांच्या आवडत्या गणेशउत्सवास आता सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरु आहे. बाप्पाच्या आगमनासाठी रात्रीपासून गर्दीला सुरुवात झाली आहे. त्यात शंभरावे वर्षे असल्याने लाखो भाविकांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे पुढे जाण्यासाठी धक्काबुक्की सुरू झाली. या सगळ्यात चार मुलींना भुरळ येऊन त्या जागीच कोसळल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बसवत यांनी स्वतः उचलून त्यांना उपचारासाठी नेले. पोलिसांच्या या नियोजनामुळे मुलींचे प्राण वाचले.
बाप्पाच्या दर्शनासाठी जमलेल्या या गर्दीसाठी जवळपास अडीचशे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. गर्दीत फोटो , सेल्फीज साठी तसेच पाकीटमार रोडरोमिओ यांची धक्काबुक्की झाली. या चेंगराचेंगरीत पोलीस उपयुक्त सौरभ त्रिपाठी तसेच वरिष्ठ निरीक्षकांसह सर्वानी काठी हातात घेत गर्दी सावरण्याचा प्रयत्न केला . काही जण किरकोळ जखमी देखील झाली, त्यात भुरळ येऊन खाली कोसळलेल्या मुलींकडे काळाचौकी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांचे लक्ष जाताच त्यांनी स्वतः त्यांना उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ५३ मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहे. त्यांचा शोध सध्या सुरु आहे.