नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सिक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (SEBI) ई-पॅनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात पॅनकार्ड सुविधेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पॅनकार्ड आणि विशिष्ट ग्राहक कोड याबाबतच्या अनिवार्य नियमांमध्ये ‘सेबी’ने बदल केले आहेत. त्यानुसार आता जिंस डेरिव्हेटीव्हजचे व्यवहार करणाऱ्या सदस्यांना विशिष्ट ग्राहक कोड वापरणे बंधनकारक करण्यास सांगितले आहे.
बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यंत्रणेवर आधारित ई-केवायसी (e-KYC) करणे गरजेचे आहे. या ई-केवायसीनंतर तात्काळ पॅनकार्ड मिळू शकते. ई-पॅनचे व्हेरिफिकेशन आता तुम्हाला घरबसल्या वेबसाइटवरून करता येऊ शकते. तसेच डेरिव्हेटीव्हजचे व्यवहार करणाऱ्या शेअर बाजारातील सदस्यांना आवश्यक व्हेरिफिकेशन करून पॅनकार्ड घेणे आणि त्याच रेकॉर्ड आपल्या कार्यालयात ठेवणे बंधनकारक आहे. याशिवाय ई-पॅनसाठी प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवरून व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.
तसेच प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवरून व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी रेकॉर्डमध्ये ठेवणे आवश्यक आहे. याबाबतचे सर्व नियम येत्या 1 एप्रिल 2021 पासून लागू केले जाणार आहेत.
असे तयार करा ई-पॅन –
– सर्वप्रथम ई-फायलिंग वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जावा
-‘Quick Links’ सेक्शनमध्ये गेल्यास ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करा.
-‘Get New PAN’ च्या लिंकवर जा
– त्यानंतर तुमचा Aadhaar आणि Captcha कोड भरा.
– Generate Aadhar OTP वर क्लिक करा.
– तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर Validate Aadhaar OTP वर क्लिक करा.
– Continue वर क्लिक करा
– तुमच्या आधारकार्डवरील माहिती योग्य असल्याचे खात्री करून नियम, शर्ती मान्य करावे.
– Submit PAN Request वर क्लिक करा.
– या सर्व प्रक्रियेनंतर एक नंबर मिळणार आहे. त्याची नोंद करा.
असे डाउनलोड करा ई-पॅन
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटच्या होमपेजवर Quick Links सेक्शनमध्ये जाऊन Instant PAN through Aadhaar वर क्लिक करा. त्यानंतर Check Status/Download PAN या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक आणि Captcha कोड भरा. त्यानंतर तुम्ही तुमचा ई-पॅन डाउनलोड करू शकता.