नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Rates Hike | भारतीय स्टेट बँकेने (State Bank of India – SBI) आपल्या आधार दरात 10 आधार अकांची (Base Rates Hike) वाढ केली आहे. एसबीआयच्या या पावलामुळे सध्याच्या कर्जदारांसाठी कर्ज थोडे महाग (Costlier Loan) होणार आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार बेस रेटमध्ये 10 बीपीएसची वाढ केली आहे. नवीन दर 15 डिसेंबर 2021 पासून प्रभावी झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबरमध्ये बँकेने आधार दर 5 आधार अंकाने कमी करून 7.45 टक्के केला होता. (SBI Rates Hike)
भारतीय स्टेट बँकेने प्राईम लेंडिंग रेट (PLR) सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने पीएलआरमध्ये 2.5 टक्के मोठी वाढ करत तो 10 टक्क्यावरून 12.30 टक्के केला आहे. तसेच, बेस रेटमध्ये 10 बेसिक पॉईंट म्हणजे 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता नवीन दर 7.55 टक्के होईल.
FD वर सुद्धा एसबीआयने वाढवले दर पण…
SBI ने 15 डिसेंबर 2021 पासून 2 कोटी रुपयांच्या वरील मुदत ठेवीवर (Term Deposits) व्याज सुद्धा वाढवले आहे. तसेच 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडी (FD) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ग्राहकांना मोठा झटका
बँकेने बेस रेट वाढवल्याने थेट परिणाम एसबीआयच्या ग्राहकांवर पडणार आहे.
बेस रेटमध्ये वाढ झाल्याने व्याजदर अगोदरच महाग होतील. ज्यामुळे कर्ज घेणार्या ग्राहकांना जास्त व्याज द्यावे लागेल.
बँकेच्या या पावलांनी होम लोन, ऑटो लोन, बिझनेस लोन आणि पर्सनल लोनचे दर वाढतील.
ग्राहकांना आता पहिल्यापेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.
Web Title :- SBI Rates Hike | state bank of india sbi hike base rate by 10 basis points bps sbi loan rates