मुंबई : ऑनलाइन – राज्यात दहावी (10th Exam) आणि बारावीच्या (12th Exam) परीक्षाबाबतीतील (Maharashtra Board Exam) संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मृल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच (Offline Exam) होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षा (Maharashtra Board Exam) या 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहेत.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याची माहीती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता 12 वीचा निकाल (Result) जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर 10 वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे (Corona Prevention Regulations) काटेकोर पालन करुनच सर्व परीक्षा पार पडतील असे गायकवाड यांनी सांगितले. (Maharashtra Board Exam)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमीकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याआगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करुन त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Web Title : Maharashtra Board Exam | 10th Maharashtra board exams march 15 12th march onwards said education minister varsha gaikwad