बहुजननामा ऑनलाईन – भारतातील मोठी असणारी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. योनो शॉपिंग कार्निवल अशी एक बंपर ऑफर आणली आहे. बँकेने आणलेल्या ऑफेरचे ग्राहकांना स्वस्त खरेदी करण्याची एक संधी मिळणार आहे. तर ४ एप्रिलपासून हे ऑफर सुरु करण्यात येणार आहे. आणि ७ एप्रिल (२०२१) पर्यंत याची मुदत राहणार आहे. तर या ऑफरमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकिंग सेवा आणि योनो प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यावर सवलतीचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय कॅशबॅकची सेवाही मिळणार आहे. बँकेने या ऑफरला योनो सुपर सेव्हिंग डे (YONO Super Saving Days) असे नाव देण्यात आले आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२१ मध्ये झालेल्या शॉपिंग कार्निव्हलच्या दुसर्या आवृत्तीत ग्राहकांचा मोठा पाठिंबा होता, त्यामुळे बँकेने तिसरी आवृत्ती आणली. मार्चमध्ये ४ ते ७ मार्च २०२१ दरम्यान कार्निवल आयोजित करण्यात आलं होत. तुम्हीही युनो SBI App वर जर UPI मार्फत पैसे भरले तर कॅशबॅक बक्षीस (यूपीआय करो, बक्षीस जीतो) अशी एक चांगली सुविधा ग्राहकाला देण्यात येणार आहे.
यामध्ये, मोठ्या प्रमाणात फायदे देण्यात आले आहेत. बँकेने या सेलमध्ये बड्या ब्रॅन्डससोबत टायअप केलं आहे. यामध्ये Amazon, Apollo 24 × 7, EasyMyTrip, Oyo आणि @ होम सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. समजा, ग्राहक आरोग्यासंबंधी काही वस्तू खरेदी करणार असले तर किंवा हॉटेल बुकिंग, फ्लाईट्स बुकिंग अशा सुविधांचा फायदा घेणार असाल तर यामध्ये ग्राहकाला तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय अॅमेझॉनच्याद्वारे काही विशेष विभागामध्ये १० टक्क्यांचा अधिक कॅशबॅक देण्यात येत आहे. या कारणामुळे ग्राहकांना त्यामुळे याचा मोठा लाभ मिळणार आहे.
या ऑफरचा भारतातील तब्बल ३.६ कोटी ग्राहक लाभ घेता येणार आहे. ग्राहकाला माहिती मिवण्यासाठी https://sbiyono.sbi/index.html वर जाऊन अधिक माहिती घेता येणार आहे. स्टेट बँकेने गृह कर्जावरील कमीतकमी व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाईटनुसार हा व्याजदर आता ६.७० टक्क्यांवरून ६.९५ टक्के झाला आहे. ह्याची नवी किंमत १ एप्रिल २०२१ पासून लागू केले जाणार आहे. तसेच, SBI ने व्याज वाढविल्याने गृहकर्ज (home loan) महागणार आहे. SBI ने कमीतकमी व्याजदरामध्ये २५ बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. अर्थातच ०.२५ टक्क्यांनी व्याज दर वाढविला आहे. यामुळे भविष्यातही गृह कर्ज महाग होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तर मागील मार्च महिन्यात खास ऑफर देत ६.७० टक्क्यांनी कर्ज उपलब्ध केले होते. हा व्याजदर सर्वात कमी होता. आता SBI ने व्याजदर कमी केल्याने इतर बँकाही दरवाढीच्या पावलावर पाऊल ठेवून व्याजदर वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .