नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांसाठी जरूरी माहिती शेयर केली आहे. बँकेने सांगितले आहे की, 22 नोव्हेंबर 2020 ला INB/YONO/YONO लाइटचा वापर करताना बँकेच्या ग्राहकांना काही अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही या अॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला ट्रांजक्शन करण्यात किंवा कोणत्याही प्रकारचे मोबाइल बॅकिंग करताना अडचणी येऊ शकतात. जर असे काही होत असेल तर ग्राहकांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही.
अपग्रेड करत आहे इंटरनेट बँकिंग
एसबीआयने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांच्या सुविधेसाठी इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहोत.
एसबीआयने म्हटले आहे की, जर तुम्ही एसबीआय नेट बॅकिंगद्वारे एखादे काम करत असाल तर त्यामध्ये अडचण येऊ शकते.
योनो अॅपवर सुद्धा येतील अडचणी
बँकेने सांगितले की, या अपग्रेडेशन प्रोसेस अंतर्गत योनो अॅप आणि योनो लाइट अॅपवर सुद्धा परिणाम होईल. अशावेळी ग्राहकांनी आपल्या कामाचे वेगळे नियोजन करावे.
एसबीआय अकाऊंटमधील बॅलन्स अशी जाणून घ्या
एसबीआयमधील खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून टोल-फ्री नंबर ’9223766666’ वर मिस्ड कॉल करा. तर एसएमएसवरून बॅलन्स जाणून घेण्यासाठी 09223766666 वर ’BAL’ एसएमएस पाठवा. यानंतर बॅलन्सची माहिती मॅसेजवर मिळेल. लक्षात ठेवा, या सुविधेसाठी तुमचा मोबाइल नंबर बँकेत रजिस्टर असायला हवा.